Numerology Mualank Six : अंकशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला विलासिता, संपत्ती, वैभव, कामुकता, समृद्धी, वैवाहिक आनंद आणि वैभवशाली जीवनाचा कारक मानले जाते. शुक्र ग्रह हा मूल्यांक ६ शी संबंधित मानला जातो. महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक ६ असतो. या मूल्यांकाला जन्मलेले लोक जीवनातील सर्व सुखसोयींचा आनंद घेतात. तसेच, या लोकांचा जीवनसाथी काळजी घेणारा आणि सुंदर असतो. त्याच वेळी हे लोक कलाकार आणि कलाप्रेमी असतात. याशिवाय या मूल्यांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा विशेष आशीर्वाद असतो. या मूल्यांकाशी संबंधित इतर माहिती जाणून घेऊ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाशी संबंधित लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तसेच या लोकांना जीवनातील सर्व सुखसोयी मिळतात. या लोकांना प्रवासाची आवड असते. हे लोक थोडे विनोदी स्वभावाचे असतात. शिवाय ते ज्या कोणत्याही मैफिलीत जातात तिथे स्वत:चा वेगळा ठसा उमटवतात. त्यांना आकर्षणाचे केंद्र बनण्याचीही आवड असते. या लोकांना म्हातारपण लवकर येत नाही. या लोकांचा स्वभाव काळजी घेणारा असतो. तसेच हे लोक व्यावहारिक असतात आणि वर्तमानात जगतात.

शुक्र ग्रहाच्या कृपेने ६ या अंकाशी संबंधित लोक खूप श्रीमंत होतात. तसेच हे लोक त्यांचे जीवन थाटामाटात आणि वैभवाने जगतात. ६ मूल्यांक असलेल्या लोकांचे ७ क्रमांकाच्या लोकांशी चांगले जमते. तसेच ६ मूल्यांकाशी संबंधित लोक फिल्म लाईन, मीडिया, मॉडेलिंग, ड्रामा आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करतात, ज्याचे त्यांना चांगले फायदे मिळतात.

व्यावसायिकदृष्ट्या हे लोक कपडे, लक्झरी वस्तू, हिरे, सोने आणि चांदीशी संबंधित व्यवसायात प्रगती साधतात. यातून त्यांना चांगली कमाई करता येते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerology venus planet effect 6 mulank 6 birth number people are always surrounded by comforts they are very self respecting sjr