October Born People: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मतारीख, वेळ व ठिकाण या गोष्टींचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीची कुंडली काढली जाते. त्याव्यतिरिक्त १२ राशी, २७ नक्षत्रे, मूलांक, भाग्यांक, जन्म वार, जन्म महिना यांच्यावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुणांबद्दल भाष्य केले जाते. नुकताच ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, त्या महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आज आपण जाणून घेऊ,

ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक कसे असतात?

प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असते. ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्यांवर शुक्र आणि बुध ग्रहांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे हे लोक लोकांना आकर्षित करण्यात पटाईत असतात. ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक मृदुभाषी, आकर्षक, नेतृत्व करण्यात पारंगत व मेहनती असतात. ते जे काही करायचे ठरवतात, ते साध्य करण्याच्या बाबतीत ते दृढनिश्चयी असतात. त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळते. ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक अत्यंत प्रामाणिक असतात. घर, घराबाहेर किंवा कामाचे ठिकाण असो, ते प्रेमसंबंध असोत वा इतर नातेसंबंधही अत्यंत काळजीपूर्वक कसे जपले जातील हे ते पाहतात. ते भावनिकदेखील असतात आणि तरीही ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात पटाईत असतात.

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती

ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, लता मंगेशकर व अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी जगभरात स्वत:च्या नावाचा दबदबा निर्माण केला आणि त्यांच्या कार्यासाठी अजूनही त्यांचे स्मरण केले जाते.

(टीप: वरील लेख प्राप्क माहितीवर आधारित आहे.)