अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि त्याचा जीवन मार्ग जन्मतारखेनुसार ठरतो. काही लोक असे असतात की त्यांची जीभ खूप धारदार असते. गोड बोलून माणसे जिंकण्याची ताकद त्यांच्याकडे असते, पण एकदा जर ते रागावले किंवा शत्रुत्व मनात ठेवले, तर ते शत्रुला चिरडून टाकतात. चला तर जाणून घेऊया कोणते असे मूलांक आहेत, ज्यांचे लोक ज्यांची वाणी दुखावणारी असते आणि राग आला तर बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत.
मूलांक ४ ( Mulank4)
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक ४ असतो. या अंकाचा अधिपती ग्रह राहु आहे. राहुच्या प्रभावामुळे हे लोक गूढ, रहस्यमय आणि मनातील गोष्टी गुप्त ठेवणारे असतात. पण एकदा कोणी त्यांना दुखावले किंवा रागवले, तर ते समोरच्याला मोठा धक्का देतात. त्यांचा राग समोरच्याला संधीच देत नाही. शिवाय त्यांची वाणी कधी कधी अत्यंत दुखवणारी असते.
मूलांक ५ ( Mulank5)
महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेले लोक मूलांक ५ चे असतात. यांचा अधिपती ग्रह बुध आहे, जो बुद्धी आणि वाणीचा कारक मानला जातो. हे लोक बुद्धिमान, चतुर आणि बोलण्यात पारंगत असतात. एकीकडे गोड बोलून लोकांना आपलेसे करण्याची कला त्यांच्यात असते, तर दुसरीकडे बोलून समोरच्याला दुखवण्याचे मारण्याचे सामर्थ्यही त्यांच्याकडे असते. त्यांची वाणी हीच त्यांची ताकद असते.
मूलांक ८ ( Mulank8)
महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेले लोक मूलांक ८ चे असतात. या अंकाचा स्वामी शनी आहे. हे लोक न्यायप्रिय, प्रामाणिक आणि कठोर परिश्रम करणारे असतात. स्वतः कुणाशी अन्याय करत नाहीत, पण कुणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते माघार घेत नाहीत. उलट असे लोक सूड घेताना समोरच्याला जीवनभर आठवण राहील असा धडा शिकवतात. त्यामुळे यांच्याशी भांडण नकोच.
मूलांक ९ ( Mulank9)
महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेले लोक मूलांक ९ चे असतात. या अंकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे असे लोक धाडसी, निर्भय आणि लढाऊ स्वभावाचे असतात. आव्हाने असो किंवा शत्रू, हे लोक कधीही घाबरत नाहीत. उलट शत्रूला पूर्णपणे सर्वनाश करूनच थांबतात. त्यांचा राग खूपच भयंकर असतो आणि रागाच्या भरात ते फारच कठोर बोलतात.
निष्कर्ष असा की अंकशास्त्रानुसार या तारखांना जन्मलेले लोक अत्यंत बोलके, कडवे सत्य बोलमारे आणि सूड घेण्याची प्रवृत्ती असलेले असतात. म्हणूनच यांच्याशी वैर घेणे धोकादायक ठरू शकते.