Premium

पितृपक्ष अष्टमीला सर्वार्थ सिद्धी योग! ‘या’ 5 राशींना लाभणार पूर्वजांची कृपा; प्रचंड श्रीमंतीसह दार ठोठावणार लक्ष्मी

Mahalakshmi Blessing: ऑक्टोबर महिन्यात तब्बल १२ वेळा सर्वार्थ सिद्धी योगाची स्थिती जुळून येत आहे. त्यातील एक आज व नंतर लगेचच दोन…

Pitru Paksh Ashtami Sarvarth Siddhi Shiv Yog On 6th and 8th october Mahalakshmi To Give Five Rashi More Money Health Astro
चंद्र गोचरासह आज पितृपक्षाला सर्वार्थ सिद्धी योग (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pitru Paksh Ashtami Sarvarth Siddhi Yog: आज म्हणजेच पितृपक्षातील अष्टमीला ६ ऑक्टोबर रोजीचे ग्रहमान हे काही राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे.आजच्या दिवशी चंद्राचे गोचर होणार असून चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी राजयोग सुद्धा तयार होत आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल १२ वेळा सर्वार्थ सिद्धी योगाची स्थिती जुळून येत आहे. त्यातील एक आज व नंतर लगेचच दोन दिवसांनी म्हणजेच ८ ऑक्टोबरला रवी पुष्य योगात सर्वार्थ सिद्धीचा प्रभाव कायम असणार आहे. आजच्या या ग्रहस्थितीचा प्रभाव विशेषतः पाच राशींवर दिसून येऊ शकतो. या राशींना पितृपक्षात अत्यंत शुभ बातमी मिळू शकते शिवाय वाडवडिलांच्या आशीर्वादाने श्रीमंतीचे दार सुद्धा तुमच्यासाठी उघडू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या हितशत्रूंची खरी बाजू दिसून येईल. कोर्टाच्या किंवा कायद्याच्या संबंधित काही खटल्यांमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. कौटुंबिक सुखात वाढ होईल. भागीदारीमध्ये केलेल्या कामाचे अत्यंत शुभ लाभ तुमच्या पदरात पडतील. माता लक्ष्मीची तुमच्यावर अपार कृपा राहील. जोडीदाराच्या साहाय्याने तुम्हाला स्वप्नपूर्ती करता येईल. नवीन वाहन किंवा जमीन- जुमल्याच्या खरेदीसाठी शुभ कालावधी आहे. नोकरदार मंडळींना अनपेक्षित व्यक्तीकडुन साहाय्य व पाठिंबा लाभु शकतो.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

सर्वार्थ सिद्धी योग बनल्याने खऱ्या अर्थाने तुमच्या राशीची सर्व बाजूंनी प्रगती होण्याची चिन्हे आहे. विशेषतः तुम्हाला नशिबाची तगडी साथ लाभू शकते. व्यावसायिकांना लाभाचे योग आहेत. वडिलांसह नातेसंबंध सुधारतील. भावंडांमधील वाद मार्गी लागतील. ज्यामुळे तुम्हाला आनंद व समाधान अनुभवायला मिळेल. तुमच्या कामाचं खूप कौतुक होईल. धार्मिक कार्यातील आवड वाढेल. तीर्थस्थानी प्रवासाचे योग आहेत. संततीकडून एखादी शुभ वार्ता मिळू शकते.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

हा कालावधी सिंह राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. आपल्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहील. अडकून पडलेली कामे पूर्ण होतील. धनप्राप्तीचे योग नशिबात दिसत आहेत. आपल्या बोलण्याने सर्वांचे लक्ष व प्रेम मिळवू शकाल. तुमच्या मान- सन्मानात वाढ होऊ शकते. तुम्हाला दीर्घकालीन टिकणाऱ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येईल. आरोग्याची हेळसांड होणार नाही याकडे लक्ष द्या.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

६ ऑक्टोबर ते पुढील दोन दिवस कन्या राशीसाठी शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकतात. सर्वार्थ सिद्धी योग व शिव योग बनल्याने तुमच्या राशीला शिवपार्वतीसह लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. जोडीदाराची साथ मिळू शकते ज्यामुळे संपत्तीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीवर जोर द्या. नोकरदार मंडळींना इतर ठिकाणहून मुलाखतीची संधी मिळू शकते. प्रेम व लग्न यामध्ये तुम्हाला थोडा मनस्ताप सहन करावा लागू शकतो पण समजूतदारीने प्रकरण हाताळल्यास हे ही संकट दूर होऊ शकते.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीसाठी सर्वार्थ सिद्धी योग व पितृपक्ष अष्टमीहा योग सुखाची सुरुवात ठरू शकतो. जुन्या मित्र-मैत्रिणींशी गाठीभेटी होतील. आठवणींमध्ये रमण्याचा हा दिवस ठरू शकतो. काही जुने संपर्क तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. नोकरीचा शोध पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्यात सकारात्मक बदल घडू शकतात. कुटुंबाबत एखादा धार्मिक कार्यक्रम असू शकतो ज्या निमित्ताने तुम्हाला नातेवाईकांना भेटता येईल. धनलाभासाठी तुमचे संपर्कच तुमचा स्रोत बनू शकणार आहेत.

हे ही वाचा<< २०२३ चे उर्वरित दिवस ‘या’ राशींच्या नावे! ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूकृपा होऊन तुम्हीही होणार का धनी व सुखी?

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pitru paksh ashtami sarvarth siddhi shiv yog on 6th and 8th october mahalakshmi to give five rashi more money health astro svs

First published on: 06-10-2023 at 10:44 IST
Next Story
२०२३ चे उर्वरित दिवस ‘या’ राशींच्या नावे! ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूकृपा होऊन तुम्हीही होणार का धनी व सुखी?