Pitru Paksha 2025: वैदिक पंचांगानुसार यंदा पितृ पक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि २१ सप्टेंबरला संपेल. १४ सप्टेंबरला व्यापाराचे दाता बुध ग्रह आपल्या उच्च राशी कन्या मध्ये प्रवेश करतील. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग तयार होईल. यामुळे काही राशींचे भाग्य उजळेल. उत्पन्न वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी…
मकर राशी (Capricorn Horoscope)
भद्र राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी चांगला ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या कुंडलीतील नवव्या भावातून जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील आणि नोकरीत पगारवाढ व बढती मिळू शकते. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. व्यापारी लोकांना आर्थिक स्थैर्य वाटेल. नोकरी करणाऱ्यांना समाजात चांगली ओळख आणि मोठे यश मिळण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
तुमच्यासाठी भद्र राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावात होत आहे. त्यामुळे या काळात कामधंद्यात चांगली प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि काम करण्याची पद्धत सुधारता येईल. व्यापाऱ्यांना हुशारीने घेतलेल्या निर्णयांमुळे फायदा होईल. या काळात तुमची बदली हवी त्या ठिकाणी होऊ शकते. तसेच वडिलांचा आधारही मिळेल.
सिंह राशी (Leo Horoscope)
भद्र राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या बोलण्यात आकर्षण वाढेल आणि लोक प्रभावित होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण होईल. व्यापाऱ्यांना आर्थिक स्थैर्य वाटेल. ज्यांचे काम मार्केटिंग, बोलणे, बँकिंग किंवा मीडियाशी संबंधित आहे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)