Rahu Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिना ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत खूप खास मानला जातो, कारण देवांचा गुरु गुरु ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. यासह राहू ग्रह मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १८ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी राहू मीन राशीतून कुंभ राशीत गोचर करेल. राहू कुंभ राशीत प्रवेश करताच काही राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात, तर अनेक राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. राहूने कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर कोणत्या राशींना फायदे मिळू शकतात जाणून घेऊ…

मकर

राहूचा कुंभ राशीतील प्रवेश मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात मकर राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. तुमची महत्त्वाकांक्षा अनेक पटींनी वाढू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता संभवते. गेल्या काही वर्षांपासून पैशांबाबत तुमचे जे स्वप्न होते ते आता पूर्ण होऊ शकते. तुम्ही अधिकाधिक पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता. शत्रूंचा पराभव करण्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे, ज्यामुळे तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. समाजात तुमचा आदर वाढू शकतो. परदेशातून तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच परदेशात प्रवासाची संधी मिळेल.

धनू

राहूचा राशी बदल धनू राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. घरातील दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टात येऊ शकतो. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुम्हाला भौतिक सुख आणि सुविधा मिळू शकतात. गेल्या काही काळापासून तुम्हाला जो आदर, सन्मान मिळायला हवा होता तो मिळत नव्हता. पण, आता तुम्ही तुमचा गमावलेला सन्मान परत मिळवू शकता. या काळात तुम्ही अनेक ठिकाणी भरपूर नफा कमवू शकता. राहूमुळे तुमचे ज्ञान, बुद्धिमत्ता वाढू शकते. तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. तुमच्या कुटुंबासह तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्ही यशाची शिडी चढत राहाल. छायाचित्रकार, चित्रपट उद्योग, टीव्ही उद्योग, मॉडेलिंग क्षेत्र किंवा सोशल मीडिया किंवा कोणत्याही प्रकारच्या संवाद माध्यमाशी संबंधित असलेल्या लोकांसाठी येणारा काळ खूप अनुकूल असेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी राहूचा कुंभ राशीत प्रवेश अनुकूल ठरू शकतो. या काळात आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आणि आव्हानांचा अंत होऊ शकतो. तुमच्या डोक्यावरून एक मोठा भार उतरल्यासारखे तुम्हाला वाटू शकते. तुमचे बिघडलेले काम अचानक पूर्ण होऊ लागेल. राजकारणाच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. यासह वैद्यकीय, खेळ, पोलिस विभाग इत्यादी क्षेत्रांत बरेच फायदे मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. कोर्ट केसेसमध्येही यश मिळू शकते. तुमच्या नोकरीत ज्या समस्या होत्या त्या आता संपू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तुम्हाला अचानक पदोन्नती मिळू शकते. पगार वाढीसह आवडत्या ठिकाणी बदलीदेखील होऊ शकते. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल तर आता तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला कोणत्याही व्यवसायासाठी किंवा इतर कामासाठी कर्ज मिळू शकते.

राहूच्या राशी बदलाने ‘या’ राशींच्या लोकांवर होईल नकारात्मक परिणाम

राहू कुंभ राशीत प्रवेश करताच काही राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण या राशीच्या लोकांना जीवनात मानसिक ताणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, वृषभ, कर्क, वृश्चिक, मीन आणि सिंह राशीच्या लोकांनी पुढील १८ महिने थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.