Rahu Mangal Shadashtak Yog: राहू आणि मंगळ हे दोन्ही उग्र ग्रह आहेत आणि त्यांचा मिलाप खूप भयानक असतो. सध्या राहू आणि मंगळ मिळून षडाष्टक योग तयार करत आहेत. हा योग ५ राशींकरिता खूप अशुभ आहे, पण या ३ राशींना मोठा फायदा देणारा आहे.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांचे शत्रू पराभूत होतील, त्यामुळे अनेक समस्या दूर होतील. करिअर मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. ज्यांची कोर्ट केस चालू आहे, त्यांना या काळात विजय मिळू शकतो.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या अविवाहित लोकांना जीवनसाथी मिळू शकतो. लग्न ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवे अवसर मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे मिळतील. मालमत्तेशी संबंधित मोठे काम पूर्ण होऊ शकते.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना मंगळ-राहूची स्थिती अनेक बाबतीत फायदा देऊ शकते. भाऊ-बहिणीचे नाते मजबूत होईल. प्रवासाला जाऊ शकता. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल, ज्यामुळे तुम्ही करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घ्याल. शत्रूंवर मात कराल.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ ग्रह आहेत आणि मंगळाचा हा गोचर व षडाष्टक योग वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा देईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. धनलाभ होईल. अडकलेले पैसे आता मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे अभ्यासात कंटाळा करू नका.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)