30 Jan 2025 Sagittarius Horoscope: ३० जानेवारी २०२५ रोजी ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी सायंकाळी ४ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहील. व्यतिपात योग दुपारी ४ वाजून ११ मिनिटांपर्यंत जागृत असेल. तसेच शुक्रवारी पहाटे ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरई होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. धनु राशीसाठी आजचा दिवसांसाठी आनंददायी ठरू शकतो. चला धनु राशींच्या लोकांचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्या..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसा जाईल धनु राशीच्या लोकांचा दिवस (How will the day go for Sagittarius people?)

धनु राशीच्या लोकांना आज नातलग भेटतील. आज तुम्ही इतरांचे कौतुक कराल. तसेच तुम्हाला उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल. याशिवाय आज तुमची प्रवासाची हौस पूर्ण करू होईल. दिवसभर आनंददायी दृष्टकोन ठेवाल. आजचा दिवस धनु राशीसाठी चांगला जाईल.

आपण जिथे खडा मारणार तिथे खडा लागणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजेच अशा वातावरणात तुम्ही तुमचा हात धुऊन घेता हे मात्र नक्कीच. आपले काम कसे पूर्ण होईल याकडे तुमचे जास्त लक्ष राहील आणि तुम्ही ते पूर्ण करून घ्याल. सध्या तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत. त्या गोष्टीसाठी फार संघर्ष करावा लागणार नाही. अगदी सहज मार्ग मिळेल. तुम्ही उंच भरारी मारू शकाल. व्यवसायातील आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाला कामात येणारे प्रस्ताव चांगले असतील. तसेच आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा नातेवाईकांशी सलोखा वाढू शकतो. भावंडाशी असलेला दुरावा कमी होईल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य साथ देईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sagittarius horoscope today 30 january 2025 daily astrology prediction for sagittarius career finance money love snk