Shani Vakri with 4 Planets: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह काही काळ वक्री (उलट चाल) आणि काही वेळा मार्गी (सरळ चाल) होतात. याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि देश-विदेशावर सुद्धा होतो. यंदा रक्षाबंधन सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. आणि या वर्षीच्या रक्षाबंधन दिवशी ४ ग्रह वक्री अवस्थेत असतील.
बुध, शनी आणि राहू – केतू वक्री अवस्थेत असतील. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. या राशींना उत्पन्नात वाढ आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
वृषभ राशी (Taurus Horoscope 9 August)
तुमच्यासाठी ४ ग्रह वक्री असणे शुभ आणि फायदेशीर ठरू शकते. या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळवण्यासाठी आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी चांगला असेल. तुम्हाला सर्व क्षेत्रात सहकार्य मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. लांब पल्ल्याच्या यात्रा फायदेशीर ठरतील. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना एखादी मोठी डील मिळू शकते.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope 9 August)
चार ग्रह वक्री असणे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि एखाद्या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. मन शांत आणि समाधानी राहील. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. यासोबतच मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
मीन राशी (Pisces Horoscope 9 August)
तुमच्यासाठी रक्षाबंधनच्या काळात ४ ग्रह वक्री असणे फायद्याचे ठरू शकते. या काळात तुम्हाला कधी तरी अचानक पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आपली कला आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तुम्ही करिअरबाबत अधिक गंभीर व्हाल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही केलेल्या योजना यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो.