Budh Pushya Nakshatra 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशीसह नक्षत्र बदल करतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांवर दिसून येतो. सध्या बुध ग्रह अश्लेषा नक्षत्र आणि कर्क राशीत स्थित आहे, तर बुध २९ जुलै २०२५ रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. शनि हा पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह मानला जातो. यात बुध देव २१ ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात भ्रमण करेल. ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या राशींना अचानक धनलाभ मिळू शकतो.

मिथुन

बुध ग्रहाचा पुष्य नक्षत्रातील बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो . या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिक इच्छित मालमत्ता खरेदी करू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना ऑगस्टच्या मध्यात बुध ग्रहाच्या कृपेने चांगली बातमी मिळू शकते. समाजात पद- प्रतिष्ठा वाढेल. या काळात तुम्हाला समाजात उच्च स्थान आणि आदर मिळेल. ज्यामुळे तुम्हाला केवळ फायदाच होणार नाही तर तुमची प्रतिमाही उजळेल. पैसा बचत करण्यात यश मिळेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध राशीतील बदल शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला करिअर, शिक्षण आणि वैवाहिक जीवनात अनेक शुभ परिणाम मिळतील. तुमचे ज्ञान वाढेल. करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ज्याचे फायदे तुम्हाला लवकरच तुमच्या करिअरमध्ये दिसून येतील. या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. नियोजित योजना यशस्वी होतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांचे निकाल सकारात्मक येण्याची शक्यता आहे.

मेष

बुध ग्रहाचा पुष्य नक्षत्रातील बदल मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्ही भौतिक सुखसोयींचा आनंद घेऊ शकाल. तुमच्या स्वभावातही बदल होईल, तुम्ही थोडे दयाळू व्हाल. या काळात मालमत्तेचा योग्य वापर करू शकाल, ज्याचे फायदे तुम्हाला लवकरच भविष्यात दिसतील. त्याच वेळी, तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना मोठा प्रोजेक्ट मिळू शकेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.