Shani Dev connection with Mulank 8 : ज्योतिषशास्त्रामध्ये जसे बारा राशींना अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रामध्ये, काही विशेष अंकाविषयी सांगितले आहे ज्याचा संबंध शनिदेवाशी असतो. या अंकावर शनिदेवाची विशेष कृपा दिसून येते आणि जीवनात यांना अपार यश मिळते. आज आपण याच अंकाविषयी जाणून घेणार आहोत.
शनिदेवाशी संबंधित अंक
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला होतो, त्यांना शनि संबंधित गुण दोष पाहायला मिळतात. या अंकांचा मूलांक ८ असतो. मूलांक म्हणजे तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हणतात. उदा.
तुमची जन्मतारीख १७ आहे तर तुमचा मूलांक हा १+७ = ८ असेन. आज आपण मूलांक ८ विषयी जाणून घेणार आहोत. प्रत्येक मूलांकची एक खासियत असते. मूलांक ८ हा शनिदेवाचा अंक मानला जातो.
हे लोक कठोर मेहनत करतात व खूप पैसा कमवतात
शनि ग्रह हा सूर्यमालिकेतील सर्वात हळूवार चालणार ग्रह आहे. अशात ज्यांचा मूलांक ८ असतो ते लोक हळू हळू पण यशस्वी नक्की होतात आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहचतात. त्यासाठी ते कठोर मेहनत घेतात.
शनिदेवाचा अंक असल्याने हे लोक खूप मेहनत करतात आणि पैसा कमवातात. हे लोक पैसा कमवण्याबरोबर धन संपत्ती जमा सुद्धा करतात. या मूलांकच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना कधीही करावा लागत नाही. त्यांच्याजवळ नेहमी भरघोस धनसंपत्ती व पैसा असतो.
अंकशास्त्रात या मूलांकविषयी काय सांगितले आहे?
असं म्हणतात की ज्या लोकांचा मूलांक ८ असतो, त्यांनी लोक शनिदेवाची आराधना करणे व त्यांच्या आवडीप्रमाणे शनिशी संबंधित वस्तूंचे दान करणे आवश्यक आहे. तसेच या लोकांनी हनुमानाची पूजा सुद्धा करावी, असे अंकशास्त्रात सांगितले आहे.
शिस्तप्रिय आयुष्य जगतात
शनिचा अंक असल्याने हे लोक खूप कष्टाळू असतात आणि कोणतेही काम खूप मनापासून करतात. ते अतिशय शिस्तप्रिय असतात आणि शिस्तप्रिय आयुष्य जगतात. यांना
मूलांचे ८ च्या लोकांचे नातेसंबंध
मूलांक ८ असलेल्या लोकांचे त्यांच्या वडीलांबरोबर दृढ संबंध नसतात आणि वैवाहित आयुष्यात जोडीदाराबरोबर त्यांची छोटो मोठे वाद होतात. मित्र आणि कुटुंबाबरोबर त्यांचे संबंध चांगले असतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)