Shani Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाची देवता शनी महाराज नवीन वर्ष २०२५ मध्ये आपली राशी बदलणार आहेत. शनी महाराज एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतात. त्यांना पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी ३० वर्षे लागतात. त्यात नवीन वर्ष २०२५ मध्ये शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत विराजमान होईल. पण मार्च २०२५ मध्ये शनी राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करील. २९ मार्च २०२५ रोजी शनी मीन राशीत गोचर करेल. शनीच्या मीन राशीतील परिवर्तनामुळे अनेक राशींमागची साडेसाती संपून, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. नशिबाला लागलेले टाळे उघडणार आहे. काही दिवसांपासून चालू असलेल्या आर्थिक अडचणी संपून, तुमची रिकामी तिजोरी धनधान्याने संपन्न होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनीचे मीन राशीतील गोचर ‘या’ राशींना करेल धनवान! नोकरी, व्यवसायातून मिळू शकेल बक्कळ पैसा

c

M

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी शनीचे मीन राशीतील संक्रमण फलदायी ठरू शकते. शनीची राशी बदलल्याने मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. या काळात त्यांना प्रवासाच्या अनेक संधी मिळू शकतात. परदेश प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांचे दीर्घ आजार आता संपुष्टात येऊ शकतात. नवीन मित्र बनतील; ज्यांचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही हुशारीने काम केले, तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी भरपूर यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.

कुंभ

शनी देवाचा कुंभ राशीतील प्रवेश शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. ज्यानंतर कुंभ राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे.अशा स्थितीत शैक्षणिक क्षेत्रात फायदा होईल. तुमच्या मेहनतीतून तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता. परदेशात काम करणाऱ्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. परदेशातील व्यापारातूनही नफा मिळू शकतो. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मालमत्तेची खरेदी-विक्री करून, तुम्ही भरपूर नफा कमवू शकता आणि उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.

हेही वाचा – Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?

u

वृषभ

वृषभ राशीसाठीही शनीचे राशी परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. नोकरदार लोकांसाठी हा काळ अधिक चांगला असू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध अधिक चांगले राहतील. त्यात तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ चाललेल्या समस्या आणि त्यामुळे मुलांना भेडसावणाऱ्या समस्याही आता संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर राहूनही तुम्हाला बढती मिळू शकते. त्यामुळे व्यवसायात भरपूर यश मिळू शकते. रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar 2024 shani dev transit in pisces in 2025 these zodiac sign get promotion financial gain get more money happiness sjr