Shani Gochar before Diwali: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी ग्रहाला नवग्रहांपैकी एक शक्तिशाली ग्रह मानलं जातं. शनी काही काळानंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. शनीला एका राशीतून परत येण्यासाठी सुमारे ३० वर्ष लागतात, आणि २७ नक्षत्रांमधून प्रवास करून परत त्याच नक्षत्रात यायला जवळपास २७ वर्ष लागतात.
सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. आता ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी शनी ‘पूर्वाभाद्रपद’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. गुरूच्या नक्षत्रात शनिचा प्रवेश होत असल्याने काही राशींना शुभ फळ मिळू शकते. चला, तर मग जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशींना याचा लाभ होणार आहे…
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनी ग्रहाचं पूर्वाभाद्रपद नक्षत्रात जाणं फायदेशीर ठरू शकतं. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं. शनि या राशीच्या नवव्या भावात असेल. त्यामुळे या लोकांचं भाग्य उजळू शकतं.
गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो. जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. परदेशातून व्यापार करून चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबात समाधान आणि आनंद राहू शकतो.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि ग्रहाचं नक्षत्र बदलणं सकारात्मक परिणाम देईल. आत्मचिंतनामुळे तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणाल. बोलण्यात गोडवा आणि नम्रता येईल, ज्यामुळे समाजात लोकप्रियता वाढेल.
नोकरीत परदेश जाण्याची संधी मिळू शकते. मात्र, आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि अनावश्यक खर्च टाळा. विचारपूर्वकच खर्च करा, म्हणजे आर्थिक अडचणींपासून वाचता येईल.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनी ग्रहाचं पूर्वाभाद्रपद नक्षत्रात जाणं शुभ परिणाम देणारं ठरेल. शनी या नक्षत्रात जाऊन या राशीच्या लग्न भावात असतील. त्यामुळे या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.
तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. राजकारण, प्रशासन किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसाय दोन्हीत यश आणि फायदा मिळेल. तुमच्या योजना यशस्वी ठरतील. शिक्षणाशी संबंधित कामात लक्ष लागेल आणि आत्मविश्वासामुळे अनेक क्षेत्रात चांगली कामगिरी कराल.