Shani Jayanti 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्म, न्याय, दुःख, रोग, पीडा, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विषयांमधील प्रभावशाली व निर्णायक ग्रह मानला जातो. दरवर्षी शनी जयंती ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी शनी देवाचा जन्म झाला होता, असे मानले जाते. सूर्य व छाया यांच्या पुत्राचा म्हणजेच शनी देवाची जयंती यंदा २७ मे रोजी साजरी होणार आहे. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी शनि जयंतीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. कृतिक नक्षत्र, रोहिणी नक्षत्र आणि सुकर्मा योग तयार होत आहेत. तसेच, सूर्य-बुध एकत्रितपणे बुधादित्य योग तयार करत आहेत. याशिवाय द्विपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होतील. हे शुभ योग एकत्रितपणे ४ राशींवर धनाचा वर्षाव करतील. या शुभ योगांमुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचा भाग्योदय, धनलाभासह करिअरमध्ये यश मिळणार!
वृषभ
शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. करिअरमध्येही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. या काळात विविध मार्गांतून तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. नोकरीत बढतीसोबतच पगारवाढीची चर्चा होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल.
मिथुन
शनिदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरी बदलण्याचे प्रयत्न पूर्ण होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसून येऊ शकते. या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.
मकर
शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण दार ठोठावू शकतात. उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुमची रखडेलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. यासोबतच व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी इच्छुक लोकांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. या काळात उच्च पद मिळू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तसेच, परदेशात जाण्याची संधी चालून येऊ शकते.
कुंभ
शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. बेरोजगारांना काम मिळू शकते. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)