Shani Gochar: शनीच्या चालीत बदल झाल्यामुळे काही राशींसाठी येणारा काळ खूपच फायदेशीर ठरणार आहे. शनी हे कर्मफळदाता म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या चालीचा परिणाम सर्व राशींवर होतो.
जुलै महिन्यापासून शनी वक्री अवस्थेत गोचर करत आहेत, ज्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार आहे. वक्री अवस्थेतून मार्गी होण्याचा प्रवास शनी २८ नोव्हेंबरच्या सकाळी पूर्ण करतील. म्हणजेच २७ नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री स्थितीत राहणार आहेत. चला तर मग पाहूया, शनीच्या या उलट्या चालीनं कोणत्या राशींचं नशीब बदलू शकतं.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मीन राशीत असलेले वक्री शनी मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनेक कामे मिळू शकतात, जी त्यांच्या प्रगतीसाठी मदत करतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. व्यावसायिकांना चांगले गुंतवणूकदार मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये थोडेफार चढ-उतार राहतील, पण संवादातून ते सोडवता येतील.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी मीन राशीतले वक्री शनी चांगली बातमी घेऊन येऊ शकतात. तुमच्या जीवनात सकारात्मकता कायम राहील. आरोग्यात थोडेफार चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थितीही चांगली राहील.
सिंह राशी (Leo Horoscope)
मीन राशीतले वक्री शनी सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. समाजात तुमची पद-प्रतिष्ठा वाढेल. शनीच्या शुभ प्रभावामुळे अनेक कामांत यश मिळेल. आर्थिक बाबींमध्ये विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. यावेळी गुंतवणुकीसाठी अनेक नवे पर्यायही मिळू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)