-उल्हास गुप्ते

Gudhi Padwa 2023 : हिंदू धर्मात माणसाच्या जीवनमानाचा खूप खोलवर विचार केला आहे. त्यातूनच हे सारे सण आपली नाती अबाधित ठेवण्यास मदत करतात. आपुलकी, प्रेम, मानसन्मान मोठ्यांचा आदर याची जाणीव नि महत्त्व सहज उमजत जाते. साधू-संतांनी लिहिलेल्या ग्रंथ-वाङ्मयातून खऱ्या अर्थाने साक्षरता जोपासली जाते आणि त्यात सणाच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती जतन करीत असतो. गुढीपाडवा हा एक असाच सण आहे जो सकारात्मक जगण्याची प्रेरणा देतो. या नूतन वर्षदिनी आपण चांगले संकल्प करून नव्या कामाची सुरुवात करीत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुढीपाडवा २०२३, तिथी व शुभ मुहूर्त (Shubh Muhurta)

२०२३ चा गुढीपाडवा बुधवार, दिनांक २२ मार्च २०२३ रोजी श्री शालिवाहन शके १९४५ शोभन नाम संवत्सर प्रारंभ होत आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा. या वर्षी चैत्र महिन्याची प्रतिपदा २१ मार्च २०२३ रोजी रात्री १०.५३ पासून सुरू होते आणि २२ मार्च २०२३ रोजी रात्री ८.२१ वाजता समाप्त होईल. उदयतिथीप्रमाणे २२ मार्च रोजी गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्यापासून हिंदू धर्माचे नूतन वर्ष सुरू होते.

महाराष्ट्रात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. तसेच आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक राज्यांमध्ये हा दिवस उगादी किंवा मुगारी म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रात या दिवशी सकाळी घराच्या बाहेरील बाजूस गुढी उभारतात व त्या गुढीची पूजा करतात. या वर्षी गुढीपूजेचा शुभमुहूर्त सकाळी ६.२९ ते ७.२९ असा आहे.

गुढी कशी उभारावी? (How To Do Gudhi Pooja)

गुढीपाडव्याच्या दिवशी काठीवर लाल, पिवळे किंवा भगवे रेशमी कापड बांधले जाते व त्यावर तांब्याचा लोटा उलटा ठेवून गुढीला फुलांनी व आंब्याच्या पानांनी सजविले जाते. तसेच घराच्या मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. तसेच दारात किंवा गुढीसमोर विविध रंगांची रांगोळी काढली जाते. या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा करतात. असे म्हटले जाते की, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली. याच दिवशी श्री प्रभु रामचंद्रांनी शत्रूचा नाश करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांचे संरक्षण केले.

गुढीपाडव्याला काय खावे? (What To Eat On Gudhi Padwa)

नूतन संवत्सर ज्या दिवशी सुरू होते त्या दिवशी अभ्यंगस्नान करून जिरे, हिंग, मीठ, ओवा, साखर व कडुनिंबाची (पुष्पासहित) कोवळी पाने यांचे चूर्ण करून चिंचेत कालवून भक्षण करावे. त्याने आरोग्य तसेच सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होते. पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे. कुटुंबातील सर्व सगस्यांनी ववीन वस्त्रे, अलंकार धारण करावेत. तसेच मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे सर्व वर्ष सुख-समृद्धीचे व आनंदी जाईल. या दिवशी पंचपक्वान्नाचे भोजन करावे. चांगल्या आचार-विचारात दिवस आनंदाने घालवावा.

गुढीपाडव्यानंतर तुमच्या राशीला काय मिळणार? (Gudhi Padwa 2023 Rashibhavishya)

प्रत्येक वर्षी नूतन संवत्सराच्या दिवशी नवीन वर्षफल श्रवण केले असता पापाचा नाश होऊन आयुष्यात यश व लक्ष्मीकृपेची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, शिव, रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू आपल्या शत्रूंचा नाश करोत. रवि आपले आरोग्य जपेल. चंद्र आपणाला यश देईल. मंगळ ऐश्वर्य देईल. बुध बुद्धी देईल. गुरू गौरव करील. शुक्र उत्तम वाणी देईल. शनि आनंद देईल. राहू आणि केतू आपल्या कुळाची उन्नती करतील.

  • तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते
  • वायूच्या श्रवणाने दीर्घायुष्य लाभते.
  • नक्षत्राच्या श्रवणाने पापनाश होतो.
  • योगाच्या श्रवणाने वियोगनाश होतो.

या वर्षी शोभननाम संवत्सरात प्रजेत एकमेकांत मैत्री वाढेल. पाऊस पडून धान्यसमृद्धी होईल, मात्र आरोग्याची काळजी घ्यावी. प्रजेला सुख लाभेल. राजा बुध असल्याने पाऊस चांगला होईल. मंगल कार्ये घडतील.

यंदा मंत्री शुक्र असल्याने पाऊस भरपूर होईल. दूधदुभते भरपूर मिळेल. मेधेश गुरू आहे. यामुळे पाऊस चांगला पडेल. धनधान्य विपुल होईल. यज्ञ – धार्मिक कार्ये होतील. खरिपाचा स्वामी रवि असल्याने चोरांपासून भीती निर्माण होईल. रसेश फल – मंगळ आहे. गूळ, तूप, मध कमी प्रमाणात मिळेल. मणी, मोती, सोने महाग होईल. मध्य धान्येशफल – या वर्षी शनी आहे. तीळ, उडीद, काळी धान्ये यांचे पीक उत्तम राहील. रवीच्या आशीर्वादाने तांबे, चंदन, माणिक, मोती, सोने मुबलक होतील.

या वर्षी वायू नावाचा मेघ असून तो वायव्येला उत्पन्न होईल. त्याचे फलस्वरूप पाऊस कमी पडेल. सर्व धान्य व वस्त्रे यांची नासाडी होईल. भय उत्पन्न होईल. या वर्षी मेघेष गुरू असल्याने भरपूर पाऊस पडेल. यापैकी दहा भाग समुद्रावर पडेल, सहा भाग पर्वतावर व चार भाग पृथ्वीवर पडेल.

।। इति संवत्सर फलं।।

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani mangal huge change on gudhi padwa 2023 astrology expert predicts extreme monsoon check zodiac rashibhavishya today svs