गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाने हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा केला जातो. गुढी पाडव्याला सर्वजण पहाटे लवकर उठतात. अंघोळ करुन सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते.
गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो आणि तयार केलेली गुढी दारामध्ये लावली जाते. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मोठमोठ्या ठिकाणी शोभायात्रा निघतात. गिरणगाव/ गिरगाव हे शोभायात्रासाठी फार प्रसिद्ध आहे. या वर्षी गुढीपाडवा १९ मार्च रोजी आहे. Read More
जागतिक अनिश्चितता आणि सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींवर मात करत, पी.एन. गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्सने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १०,००० कोटी रुपयांच्या…
वसई-विरारमधील शोभायात्रेत यंदा परंपरेसोबतच आधुनिक विज्ञानाचा आविष्कार पाहायला मिळाला. वर्तक इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सोलार वाहनाने’ इंधन स्वावलंबनाचा संदेश…
वसई-विरारमध्ये हिंदू नववर्षाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. विरारमधील २३ वर्षांची परंपरा आणि वसईतील ‘रुद्र…