Shani Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मफळ दाता शनी हा नऊ ग्रहांपैकी सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो, कारण शनीदेव एका राशीत सुमारे अडीच वर्षे विराजमान असतात. अशाप्रकारे एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी शनी देवाला सुमारे ३० वर्षे लागतात. पण, शनीच्या राशी बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात दीर्घकाळ परिणाम होत असतो. शनीला कर्मफळ दाता आणि न्याय देवता म्हणतात, कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनी हा सर्वात क्रूर ग्रहदेखील मानला जातो. क्रूर ग्रह असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जीवनात कधी ना कधी शनी दोष, महादशेला सामोरे जावे लागते. यावेळी शनी त्याची मूळ रास म्हणजे कुंभ राशीत स्थित आहे. सध्या तो वक्री अवस्थेत आहे. पण, दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात तो पुन्हा मार्गस्थ होईल. शनीची सरळ चाल काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते, तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया, शनी मार्गी झाल्यानंतर कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द्रीक पंचांगनुसार, १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.५१ वाजता शनी थेट कुंभ राशीत मार्गी होईल, शनीच्या सरळ चालीमुळे तीन राशींना भरपूर लाभ मिळू शकतो.

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी शनीचे मार्गी होणे फलदायी ठरू शकते. या काळात तुमची दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. कर्जापासून मुक्ती मिळू शकते, अनेक थकीत आर्थिक व्यवहार मार्गी लागतील, या काळात तुम्हाला आर्थिक व्यवहारांसंबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. तसेच नवीन नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या कामाचा विचार करून तुम्हाला बढती मिळू शकते. कुटुंबासह चांगला वेळ घालवता येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी प्रोत्साहनासह पद बढती मिळण्याची शक्यता जास्त आहे. व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करून तुम्हाला लाभ मिळू शकतो. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. दीर्घकाळ चाललेल्या आरोग्याच्या समस्या आता संपू शकतात.

Read More Latest Astrology News : Gajkesari Yog : दिवाळीपूर्वी नशीब फळफळणार, लखपती होणार! गजकेसरी योगामुळे ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना शनीचे मार्गी होणे फायदेशीर ठरू शकते. या काळात त्यांच्या करिअरसंबंधित असलेल्या अडचणी आता दूर होऊ शकतात. याचबरोबर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. सकारात्मक ऊर्जा अधिक वाढू शकते. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देऊ शकतो. तुम्हाला खूप चांगले आर्थिक फायदे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारू शकते. मोठ्या आर्थिक संकटातून आता तुम्हाला दिलासा मिळेल. आरोग्यही चांगले राहील.

कन्या (Virgo)

कन्या राशीवरही शनी देवाची विशेष कृपा राहील. या काळात अनावश्यक खर्चाला आतापासूनच आळा बसू शकतो. कर्जातून सुटका मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामाचा विचार करून तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देण्यात यशस्वी होऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani margi 2024 in kumbh rashi after diwali 2024 these 3 zodiac sign will get benefit in finance and career astrology horoscope sjr