Shani Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो.
पंचांगानुसार, शनी २०२६ केवळ तीन वेळा नक्षत्र परिवर्तन करणार आहे. २० जानेवारी २०२६ रोजी उत्तर भाद्रपद नक्षत्रामध्ये दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. २०२६ मधील शनीचे हे पहिले नक्षत्र परिवर्तन असेल. त्यानंतर शनी १७ मे २०२६ रोजी रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी तो पुन्हा उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शनीचे हे गोचर करेल. २०२६ मध्ये शनीचे तीन वेळा होणारे हे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल.
२०२६ मध्ये शनीचे तीन वेळा नक्षत्र गोचर
मिथुन (Mithun Rashi)
२०२६ मध्ये शनीचे तीन वेळा होणारे नक्षत्र गोचर मिथुन राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींना २०२६ मध्ये शनीचे तीन वेळा होणारे नक्षत्र गोचर खूप सकारात्मक फळ देईल. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींना २०२६ मध्ये शनीचे तीन वेळा होणारे नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
