Samsaptak Yog: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राजयोग आणि शुभ योग तयार करतात. याचा मोठा परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि जगावर दिसून येतो. शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी वैदिक ज्योतिषातील दोन महत्त्वाचे ग्रह समसप्तक योग तयार करत आहेत. हे दोन ग्रह म्हणजे शुक्र आणि शनी.

या योगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. तसेच मन आनंदी राहील. चला तर मग पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मकर राशी (Capricorn Horoscope)

समसप्तक योग तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. या काळात तुमचं धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. जीवनात काही सकारात्मक बदल दिसतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे बढतीचे योग तयार होतील. व्यवसायातही नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात तुम्ही एखादी लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. तसेच नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये ज्युनिअर आणि सीनिअर दोघांचा चांगला पाठिंबा मिळू शकतो.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

समसप्तक योगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुम्हाला कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. तुमच्या योजना यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांची बदली इच्छित ठिकाणी होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल आणि समाजात मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची आणि कौशल्याची प्रशंसा होईल. जे लोक सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो आणि व्यवसाय वाढ होऊ शकते.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

समसप्तक योग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात. मेहनत केल्यास यश मिळेल. आरोग्यही चांगले राहील. कंपनीत उच्च पदावर असलेल्या लोकांना नवीन नेतृत्वाच्या संधी मिळू शकतात. परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्येही यश मिळू शकते. या काळात गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)