Dwadash Yog 2025 : फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या स्थिती बदलाने १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम होणार आहे. यात नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीची जेव्हा एखाद्या ग्रहाशी युती होते किंवा एखाद्या ग्रहावर त्याची वक्रदृष्टी पडते, तेव्हा शुभ आणि अशुभ योग तयार होतात. यात ६ फेब्रुवारी रोजी शनी आणि सूर्य एकमेकांपासून ३० अंशांच्या स्थानावर असतील, ज्यामुळे द्विदश दृष्टी निर्माण होईल. याला द्विदश योग असेही म्हणतात. या शक्तिशाली योगाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे निश्चितच होईल. पण, १२ पैकी तीन राशींना हा योग शुभ सिद्ध होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनी कुंभ राशीत आहे आणि सूर्य मकर राशीत आहे. ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी ते एकमेकांपासून ३० अंशांवर असतील, ज्यामुळे द्विदश योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो.

द्वादश योगाने ‘या’ तीन राशी होतील मालामाल, लव्ह लाइफमध्ये येतील आनंदाचे क्षण

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी द्विदशा योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. यासह त्यांना नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायही अनुकूल राहील. पैसे कमविण्याच्या अनेक संधी असू शकतात. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कडक स्पर्धा देताना दिसाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. यामुळे तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या लव्ह लाइफमध्ये आनंदाचे क्षण येऊ शकतात. आरोग्यही चांगले राहू शकते.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी द्विदश योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रांत यश मिळवू शकतात. यासह तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकता. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही मेहनत घ्याल. तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते. यासह तुम्ही आर्थिक गुंतवणुकीतून भरपूर पैसे कमवू शकता. यासह लव्ह लाइफ चांगले जाणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. शनीच्या आशीर्वादाने तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे.

धनु

धनु या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा द्विदश योग खूप शुभ सिद्ध ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली प्रगती साधू शकता. यासह तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून तो वेळ तुमच्या कुटुंबाबरोबर घालवू शकता. आर्थिक परिस्थितीही चांगली राहणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक विचार करून पैसे खर्च कराल, त्यामुळे तुम्हाला पैशांची बचत करता येऊ शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. तुमच्या जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल आणि लक्ष्मी तुमचे दार ठोठावेल.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. )

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani surya gochar 2025 sun and saturn on 30 degree make dwadash yog these 3 zodiac sign will be shine get more money happiness sjr