Shani Vakri 2025 : कर्मफळदाता शनी हा सर्वात क्रूर ग्रहांपैकी एक मानला जातो. शनी ग्रह प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनी हा सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह मानला जातो. अलीकडेच शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. गुरु ग्रहाच्या मीन राशीत शनीच्या प्रवेशाने काही राशींना गुरु ग्रहाचेही विशेष आशीर्वाद मिळू शकतात. २०२७ पर्यंत शनी या राशीत राहील. या काळात त्याची स्थिती बदलत राहील. त्याचप्रमाणे जुलै महिन्यात शनी मीन राशीत वक्री करेल. शनीची वक्री अवस्था ही शक्तिशाली मानली जाते, ज्यामुळे शनी वक्री होताच १२ पैकी तीन राशींना खूप फायदे मिळू शकतात.

न्यायदेवता शनीदेव १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ०७ वाजून २४ मिनिटांनी मीन राशीत वक्री होईल, तर २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०७ वाजून २६ मिनिटांनी प्रत्यक्ष उलटी चाल करेल. शनी सुमारे १३८ दिवस वक्री गतीत राहील. शनी इतक्या दिवसांपासून वक्री होत असल्याने या तिन्ही राशींना खूप फायदे मिळू शकतात.

कर्क (Cancer)

शनीची वक्री स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीत जन्मलेल्या लोकांना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. या राशीच्या लोकांचे प्रत्येक कामातील अडथळे हळूहळू दूर होऊ शकतात. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकतील. जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव्हचे प्लॅन होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुमचे उत्पन्न वेगाने वाढू शकते. आर्थिक गुंतवणूकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. पण, वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा साडेसतीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अशा परिस्थितीत, या शनीची वक्री चाल कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळवून देऊ शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. परदेशात व्यवसायाचा योग आहे. यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. कोणत्याही कामातील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकेल.

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री स्थिती फायदेशीर ठरू शकते. या काळात मकर राशीच्या लोकांचे ट्रिपचे प्लॅन होऊ शकतात. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. अध्यात्मात खूप रस असेल, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल. भाऊ-बहिणींबरोबर गोड संबंध प्रस्थापित होऊ शकतात. अनेक अनोळखी लोकांशी मैत्री होईल. शनीच्या साडेसातीपासून आराम मिळू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. तुमचे आयुष्य हळूहळू पुन्हा रुळावर येईल. व्यवसायात तुम्हाला काही जोखीम घ्यावी लागू शकते, पण तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता.