Shani Sadesati 2025 : शनि की साढ़ेसाती से हर कोई डरता है. हालांकि जातक के कर्म अच्‍छे हों और कुंडली में शनि शुभ स्थिति में हो तो शनि शुभ फल भी देते हैं. वहीं बुरे कर्म वालों पर शनि जमकर कहर ढाते हैं.

शनिची साडेसाती ही ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. ज्योतिषशास्त्रेनुसार हा काळ व्यक्तीच्या आयुष्यात ताण तणाव, आर्थिक चढ उतार, मानसिक अस्थिरता आणि समस्या घेऊन येतो. पण सतर्कतेने आणि संयम ठेवून या काळाचा सामना करणे सोपी जाते. साडेसाती ही ७.५ वर्षांचा कालावधी असतो. जेव्हा शनि ग्रह एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीतल्या चंद्राच्या आधीची, त्याच राशीत आणि नंतरची रास म्हणजे एकूण तीन राशीत प्रवेश करतो त्याला साडेसाती म्हणतात.
उदा. धनु चंद्राच्या आधीच्या राशीमध्ये येतो तेव्हा साडेसाती सुरू होते. जेव्हा शनि मकर राशीमध्ये येतो तेव्हा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि जेव्हा शनि कुंभ राशीमध्ये जातो तेव्हा साडेसातीचा शेवटचा टप्पा असतो.
या वेळी शनि मीन राशीमध्ये आहे आणि तीन राशींवर साडेसाती सुरू आहे ज्यामध्ये या राशींच्या लोकांवर शनिची कडक दृष्टी आहे. शनि या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देणार आहे.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना या वर्षी २०२५ मध्ये शनिची साडेसाती सुरू झाली आहे आणि साडे सात वर्षांपर्यंत ही साडेसाती सुरू असणार. या वेळी मेष राशीमध्ये साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. दुसरा टप्पा २०२७ मध्ये सुरू होणार, जो खूप कष्ट देणारा असेल. २०३२ मध्ये मेष राशीला साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे, जो शेवटचा टप्पा आहे. या लोकांना २०२७ मध्ये शनिची साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तसेच शनि कुंभ राशीचे स्वामी आहे. या लोकांवर शनिची विशेष कृपा असणार आहे.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे, जो खूप त्रासदायक मानला जातो. या दरम्यान अपघात, आजार आणि आर्थिक तोटा, तणाव, नातेसंबंधामध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मीन राशीच्या लोकांना २०२९ मध्ये साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

साडेसाती दरम्यान हे काम करू नये

शनिची साडेसाती सुरू असताना काही काम करू नये, जे शनिदेवाला अप्रिय आहेत. साडेसाती दरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवावे. वादविवादांपासून दूर राहावे. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. गरीब, कष्टाळू, स्वच्छता कर्मचाऱ्यांना, वृद्धांना आणि महिलांना त्रास देऊ नये. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. रागावर नियंत्रण ठेवावे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)