Shravan Shivamuth 2025 : हिंदू धर्म शास्त्रात, चातुर्मासातील श्रावण महिन्यास विशेष महत्व आहे. हा व्रत वैकल्य आणि सणवारांचा महिना असतो. या महिन्यातील सोमवार हा शिवशंकराला समर्पित मानला जातो. यामुळे श्रावणात प्रत्येक सोमवारी शंकराची खास पूजाअर्चा, अभिषेक केला जातो. उत्तर भारतीय पंचांगानुसार, श्रावण महिना सुरु झाला आहे. पण महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांत शुक्रवारी, २५ जुलै २०२५ पासून श्रावण मास सुरु होत आहे. जो २३ ऑगस्ट २०२५ रोजी समाप्त होईल. यंदा चार सोमवार आले आहेत. या श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभो शंकराला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. पण ही शिवामूठ का वाहिली जाते? शिवामूठ वाहण्याचे महत्त्व काय जाणून घेऊ…
पवित्र मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केले जाते.
या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत २८ जुलै, ४ ऑगस्ट , ११ ऑगस्ट , १८ ऑगस्ट आणि या दिवशी असणार आहे. या महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवारी हे व्रत केले जाते.
श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक, पूजा केली जाते. शिवामूठ वाहिली जाते आणि अशा प्रकारे हे व्रत केले जाते. सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरू असतात. या पवित्र श्रावण महिन्यातील व्रते भक्ती भावाने केली जातात.
शिवामूठ व्रत करण्याची पद्धत (Shivamuth Signification)
विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते.
शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते.