Shubha Yog on MahaAshtami 2025: शारदीय नवरात्रीचा उत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू झाला असून २ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. शारदीय नवरात्रीच्या महाअष्टमीचे पर्व ३० सप्टेंबरला मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जाणार आहे. या दिवशी देवी दुर्गेच्या आठव्या स्वरूप माता महागौरीची उपासना केली जाते आणि कन्या पूजनदेखील मोठ्या श्रद्धेने केले जाते. पंचांगानुसार, महाअष्टमीचा दिवस अत्यंत खास आणि शुभ मानला जातो.

वास्तविक या दिवशी सूर्य आणि बुध यांची युती ‘बुधादित्य योग’ तयार करत आहे. याशिवाय बुध आपल्या राशीत असल्याने ‘भद्र राजयोग’देखील निर्माण होत आहे. तसेच सूर्य-यम संयोगामुळे नवपंचम योग, शुक्र-गुरु संयोगामुळे अर्धकेंद्र योग आणि शोभन योगदेखील महाअष्टमीच्या दिवशी बनत आहे. या सर्व दुर्लभ योगांचे संयोग महाअष्टमीच्या दिवसाला अधिक खास बनवणार आहे. तर पाहूया महाअष्टमीच्या शुभ योगामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे:

महाअष्टमीला मिळेल आणि समाधान? जाणून घ्या लाभ होणाऱ्या राशी

१. मेष

मेष राशीच्या लोकांसाठी महाअष्टमीचा दिवस करिअरमध्ये प्रगती आणणारा ठरेल. जी जुनी अडकलेली कामे आहेत, त्यात गती येऊ शकते. अचानक नोकरीमध्ये किंवा व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल.

२. वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी महाअष्टमी अत्यंत शुभ राहील. आर्थिक अडचणी दूर होतील आणि गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ आहे. चालू असलेले वाद-विवाद सकारात्मक मार्गावर येण्याची शक्यता आहे. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि धनलाभाची संधी मिळू शकेल.

३. कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस नवीन संधी आणि नाते तयार करणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही महाअष्टमी अत्यंत शुभ राहणार आहे, मोठा धनलाभ होऊ शकतो.

४. मकर

मकर राशीच्या लोकांच्या जीवनात महाअष्टमी आनंदाची नवीन लहर घेऊन येईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी लोकांसाठी हा दिवस अत्यंत लाभकारी ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळेल.

५. कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना माता महागौरीची विशेष कृपा प्राप्त होईल. मनोकामना पूर्ण होतील आणि मानसिक शांती मिळेल. शुभ कार्याची सुरुवात करता येईल. विवाहयोग्य असलेल्या लोकांना उत्तम नाते प्राप्त होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात : महाअष्टमीच्या या शुभ दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचे दुर्मीळ योग अनेक राशींना नवे यश, धनलाभ आणि आनंद घेऊन येणार आहेत. महागौरीच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सकारात्मक बदल घडतील.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)