Shukra Gochar on 9 October: वैदिक पंचांगानुसार ऐश्वर्य आणि ऐशोआराम देणारे शुक्र ग्रह दिवाळीपूर्वी ९ ऑक्टोबरला कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. कन्या राशीचे स्वामी बुध आहेत आणि शुक्र ग्रहाचा बुधासोबत चांगला संबंध आहे. त्यामुळे या गोचराचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचे नशीब या बदलामुळे उजळू शकते. त्यांच्या धन- संपत्तीत वाढ होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचा राशी बदल उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून उत्पन्न व लाभ भावात प्रवास करणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील. कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही समाजात लोकप्रिय व्हाल. मुलांच्या प्रगतीची चिन्हे दिसतील.
सिंह राशी (Leo Horoscope)
तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र देव तुमच्या कुंडलीतील धन आणि वाणी भावातून प्रवास करणार आहेत. त्यामुळे या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. बोलण्यात प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तुम्हाला कुटुंबासोबत भरपूर आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात संतुलन राहील. पुढील काळात कुटुंबात नवीन सदस्य येऊ शकतो. तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढेल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
शुक्र ग्रहाचा राशी बदल धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हे गोचर तुमच्या राशीपासून कर्मस्थानात होणार आहे. त्यामुळे या काळात कामधंद्यात चांगली प्रगती होऊ शकते. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. व्यापाऱ्यांना आर्थिक समृद्धी जाणवेल. नोकरी करणाऱ्यांना समाजात मोठं स्थान मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच या काळात वडिलांशी नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)