Malavya rajyog in meen: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. शुक्रदेखील इतर ग्रहांप्रमाणे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो. मार्चमध्ये शुक्राचा आपली उच्च राशी असलेल्या मीनमध्ये उदय होणार आहे. ज्यामुळे ‘मालव्य राजयोग’ निर्माण होईल. या राजयोगाच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना भौतिक सुख, संपत्ती प्राप्त होण्यास मदत होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्र देणार बक्कळ पैसा

वृषभ

मालव्य राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

धनु

धनु राशीसाठीदेखील मालव्य राजयोग खूप लाभदायी सिद्ध ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

कुंभ

मालव्य राजयोग कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक आयुष्यात गोडवा निर्माण होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra will make malavya rajyog grace of goddess lakshmi will be on these three zodic sign sap