Surya Gochar In Mesh Rashi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, सूर्यदेव सन्मान, प्रतिष्ठा, सरकारी नोकरी आणि राजकारणाचा कारक ग्रह मानला जातो. सूर्यदेवाच्या स्थितीत जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो. यात १२ महिन्यांनंतर सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. मेष राशीवर मंगळ ग्रहाचे राज्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि मंगळ यांच्यात मैत्री आहे, यामुळे सूर्यदेवाच्या गोचरमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. त्यांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढू शकते. पण, कोणत्या राशींना सूर्य गोचर फलदायी ठरू शकते जाणून घेऊ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्य मेष राशीत गोचर होताच या राशींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रसिद्धी

सिंह (Leo Zodiac)

सूर्याचे गोचर सिंह राशीसाठी फलदायी ठरू शकते. या काळात तुमचे भाग्य उजळू शकते. तसेच आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढू शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळू शकतो. तसेच, तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तु्म्हाला नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवासाची संधी मिळू शकते. या काळात तुमचा आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी असेल आणि यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

मिथुन (Mithun Zodiac)

सूर्याच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना अच्छे दिन येऊ शकतात. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे कमवू शकाल. त्याच वेळी व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्ही काही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता, यातून तु्म्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनू शकता. तुम्हाला नवीन क्लायंट आणि व्यवसायात पार्टनरशीपच्या संधीदेखील मिळू शकतात. त्याचवेळी तुम्हाला विविध आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल.

धनु (Dhanu Zodiac)

सूर्यदेवाचा मेष राशीतील प्रवेश धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. म्हणजे तुम्हाला यावेळी नोकरी मिळू शकते. लग्नासाठी शुभ योग जुळून येतील. या काळात तुम्हाला प्रेमसंबंधांमध्येही यश मिळू शकते. प्रेमसंबंधाचे रूपांतर लवकर लग्नात होऊ शकते. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच यावेळी तुम्हाला सोशल नेटवर्किंगद्वारे प्रसिद्धी मिळण्याची अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya gochar 2025 sun transit surya planet gochar in meesh these zodiac sign can be more shine and get more money sjr