Surya Grahan Time: वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण झालं आहे आणि आता सूर्यग्रहण होणार आहे. ही एक आकाशातील घटना आहे. पण ज्योतिष आणि धर्म या दोन्हींत याला खूप महत्त्व आहे.

धार्मिक दृष्टीने पाहिल्यास, सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा राहू किंवा केतू सूर्याला झाकतात. त्या वेळी सूर्यदेव त्रस्त होतात. सूर्यग्रहणात जर सूतक काळ असेल, तर लग्न, शुभ कामे होत नाहीत आणि मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. चला तर मग जाणून घेऊया वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण कोणत्या वेळी लागेल आणि सूतक काळ लागू होईल की नाही…

वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण २०२५ मध्ये कधी लागेल?

वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी, रविवारी लागणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री १०:५९ वाजता सुरू होऊन साधारण ३:२३ वाजेपर्यंत चालेल. याचा मध्यकाळ रात्री १:११ वाजता असेल. एकूण वेळ साधारण ४ तास २४ मिनिटांचा असेल.

शेवटचं सूर्यग्रहण भारतात दिसेल का?

हे सूर्यग्रहण रात्री लागणार असल्याने भारतात दिसणार नाही.

शेवटच्या सूर्यग्रहणाचा सुतक काळ

शास्त्रानुसार सूर्यग्रहणापूर्वी १२ तासांचा सूतक काळ असतो. पण हे ग्रहण रात्री होणार आहे आणि भारतात दिसणार नाही, त्यामुळे इथे सूतक काळ लागू होणार नाही. मंदिराचे दरवाजे बंद करणे किंवा शुभ कामांवर बंदी लागणे याचा नियम लागू होणार नाही.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कुठे दिसेल?

हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर आणि अंटार्क्टिकात दिसणार आहे.

सूर्यग्रहण आणि राहू-केतू यांचा संबंध

सूर्य आणि चंद्र जेव्हा राहू किंवा केतूच्या जवळ येतात, तेव्हा ग्रहण होते. राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हटले जाते. हे खरे ग्रह नाहीत, तर चंद्राच्या कक्षे आणि पृथ्वीच्या भोवतालच्या मार्गाचे छेदबिंदू (Nodes) आहेत. अमावस्येवेळी सूर्य आणि चंद्र हे नोड्स (राहू-केतू) जवळ येतात, तेव्हा सूर्यग्रहण होते. तसेच, पौर्णिमेला चंद्र राहू किंवा केतूच्या जवळ येतो, तेव्हा चंद्रग्रहण होते.

सूर्यग्रहणाचा राशींवर परिणाम?

वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. पण ज्योतिषांनुसार हे देश-विदेशात दिसणार आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कन्या राशीत असेल. त्यामुळे मिथुन, सिंह, कन्या, तुला, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना ग्रहणाचे थोडे साइड इफेक्ट्स जाणवू शकतात. मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांच्या जीवनावर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही, त्यांना सकारात्मक परिणाम दिसतील.

२०२६ चे पहिले सूर्यग्रहण

२०२६चं पहिलं सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागणार आहे. हे एक वलयाकार सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) असेल. या वेळेस सूर्य आकाशात चमकणाऱ्या “रिंग ऑफ फायर” सारखा दिसेल. हा अद्भुत खगोलीय नजारा सुमारे ३ मिनिटे २० सेकंद टिकेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)