Surya Mahadasha Effects on Zodiac Signs: सूर्यदेवाला मान-सन्मान, यश, आत्मविश्वास, वडील, सत्ता, शासन-प्रशासन आणि सरकारी नोकरीचा कारक मानले जाते. दर महिन्याला राशी बदलणाऱ्या सूर्याची महादशा ६ वर्षे चालते. या काळात सूर्य काही विशिष्ट लोकांना मोठी प्रगती देतात.
सूर्याच्या महादशेचा लाभ
सूर्याची महादशा अपार यश, कीर्ती, धन आणि प्रसिद्धी देते. ज्यांच्या कुंडलीत सूर्य शुभ असतो, त्यांना या ६ वर्षांत खूप लोकप्रियता मिळते. ते संपूर्ण जगात नाव कमावतात आणि सर्व सुखांचा आनंद घेतात.
सूर्याची महादशा ‘या’ २ राशींसाठी शुभ
साधारणपणे कुंडलीत ग्रहांची स्थिती पाहून जीवनात धन, कीर्ती, प्रेम, पद वगैरे मिळणार का हे समजते. पण राशीवरूनही बऱ्याच गोष्टी कळतात. ज्योतिषानुसार मेष आणि सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याची महादशा खूप शुभ ठरते.
कीर्ती आकाशाला भिडते
खरं तर, मेष राशीत सूर्य उच्च स्थानावर असतो. तसेच सिंह राशीचे स्वामी स्वतः सूर्यदेव आहेत. त्यामुळे या दोन्ही राशीच्या लोकांना सूर्याच्या महादशेत खूप लोकप्रियता, धन आणि यश मिळते. विशेषतः राजकारण आणि शासन-प्रशासन क्षेत्रात मोठा फायदा होतो.
सूर्याच्या महादशाचे परिणाम
जर कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असेल किंवा सूर्याच्या शत्रू ग्रहाच्या राशीवर महादशा चालू असेल, तर त्या व्यक्तीला खूप त्रास होतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. ते निराश आणि निष्क्रिय राहतात. प्रत्येक कामात अपयश मिळते. मात्र सूर्याच्या महादशेत इतर ग्रहांच्या अंतर्दशा चालू असल्यास त्याचा परिणाम बदलत राहतो.
सूर्याच्या महादशेचे उपाय
ज्यांना सूर्याची महादशा अशुभ परिणाम देते, त्यांनी त्याच्या नकारात्मक परिणामांपासून बचाव करण्यासाठी उपाय करावे. या काळात अनेक आजार त्रास देऊ शकतात. सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे दररोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ‘ॐ सूर्याय नमः’ हा मंत्र जपावा. रविवारी उपवास करावा, तसेच सूर्याशी संबंधित वस्तू जसे की गहू, गूळ, तूप, तांब्याची भांडी यांचे दान करावे. याशिवाय रोज आंघोळ केल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने आत्मबल वाढते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
