Surya Nakshatra Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचे राजा सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतात. एका ठराविक कालावधीनंतर ते नक्षत्र परिवर्तन करतात ज्याचा थेट परिणाम १२ राशींच्या जीवनावर पडतो. सूर्य होळीच्या दिवशी १४ मार्च म्हणजे मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १८ मार्च ला ३.२० मिनिटांवर उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य आपला पुत्र शनि नक्षत्रामध्ये प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. जाणून घेऊ या कोणत्या राशींना मोठा लाभ होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२७ नक्षत्रांमध्ये २६ वा नक्षत्र उत्तराभाद्रपद नक्षत्र आहे. या नक्षत्राचे स्वामी ग्रह शनि आणि राशी मीन आहे. मीन राशीचे स्वामी गुरू आहे. अशात या नक्षत्राच्या वर शनिबरोबर गुरूचे सुद्धा सहकार्य असते.

मेष राशी (Mesh Zodiac)

सूर्य उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या अकराव्या भावात विराजमान होणार आहे. अशात या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अप्रत्याक्षित धनलाभ मिळू शकतो. जर हे लोक लोन घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यांना लाभ मिळू शकतो. भौतिक सुख प्राप्त होऊ शकते. तसेच जीवनात भरपूर आनंद मिळू शकतो.

करिअरच्या क्षेत्रात कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठांना तुमचे काम आवडेल.ज्यामुळे या लोकांची प्रगती होऊ शकते. व्यवसायात नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन आणि पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. लव्ह लाइफ उत्तम राहीन. दांपत्य जीवनात वेळ चांगला घालवाल. आरोग्य उत्तम राहीन.

तुळ राशी (Tula Zodiac)

सूर्य उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश केल्याने या राशीच्या नवव्या भावात राहणार आहे. अशात या राशीच्या लोकांवप सूर्याची कृपा दिसून येईल. सूर्याच्या कृपेने नशीबाची साथ मिळेल. समाजात मान सन्मान मिळेल. हे लोक आपल्या शब्दांनी आणि बोलण्याने समोरच्या लोकांना प्रेरित करतील.

कामाच्या ठिकाणी या लोकांचे वरिष्ठांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होईल. व्यवसायात नफा मिळेल. अडकलेले काम पूर्ण होईल. आर्थिक स्थिती चांगली राहीन. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवतील. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहीन.

वृश्चिक राशी ((Vrashchik Zodiac)

ग्रहांचे राजा सूर्य वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करून पाचव्या भावात विराजमान राहणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होईल. हे लोक कामावर लक्ष केंद्रित करतील. शिक्षण क्षेत्रात हे लोक अव्वल दिसून येईल. बौद्धिक क्षमता वाढेन. या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती दिसून येईल.

शेअर मार्केट आणि ट्रेडच्या माध्यमातून बिझिनेसमध्ये वाढ दिसून येईल. या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. धन पैसा जमा करण्यात हे लोक यशस्वी होतील. लव्ह लाइफ उत्तम राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya nakshatra gochar 2025 sun transit in uttara bhadrapada nakshatra three zodiac get enough money wealth respect ndj