Best Zodiac Signs for Teachers: दरवर्षी ५ सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. हा दिवस फक्त शिक्षकांचा गौरव करण्यापुरता नसून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या त्या थोर व्यक्तींना स्मरण करण्याचाही दिवस आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी हा उत्सव साजरा होतो. पण, तुम्हाला ठाऊक आहे का की, त्यांच्या कुंडलीत सिंह राशी व धनू लग्न असल्यामुळेच त्यांच्या आयुष्यात शिक्षकपणाची छाप अधिक गडद झाली होती?

आणि इथेच खरी मजा आहे. कारण- ज्योतिषशास्त्र सांगतंय की, काही राशींमध्ये जन्म घेणारे लोक, अगदी नकळतच, असामान्य शिक्षक बनतात. त्यांच्या ज्ञानाने, मार्गदर्शनाने व कठोर परिश्रमाने ते विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवतात. आता तुमच्याच मनात प्रश्न येतोय ना नेमक्या कोणत्या या ५ राशी? चला, जाणून घेऊया…

‘या’ राशींचे लोक विद्यार्थ्यांचे जीवन करू शकतात उज्वल?

मिथुन

या राशीचे लोक बोलण्यात आणि ज्ञान देण्यात इतके पटाईत असतात की, विद्यार्थ्यांना ते सहज आकर्षित करतात. बुधाच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धी तीक्ष्ण आणि विचार स्पष्ट असतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ते त्वरित उत्तरे देतात. म्हणूनच ते आदर्श शिक्षक ठरतात.

सिंह

सूर्याच्या तेजानं उजळणारी ही रास नेतृत्व व शिस्त यांसाठी ओळखली जाते. सिंह राशीचे शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त शिकवत नाहीत, तर स्वतःत बदल करूनही त्यांना मार्ग दाखवतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कडक शिस्त आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो.

तूळ

शुक्राच्या प्रभावाने संतुलित विचार आणि रचनात्मकता या राशीला लाभते. तूळ राशीचे लोक अडचणीतून मार्ग काढण्यात पटाईत असतात. ते विद्यार्थ्यांच्या समस्यांना सहजतेने सोडवतात आणि शिकवणं एक आनंददायी अनुभव बनवतात.

धनू

गुरु बृहस्पतीच्या अधिपत्याखाली असणारी ही रास शिक्षण आणि अध्यापनासाठी सर्वांत जास्त उपयुक्त मानली जाते. हे लोक दूरदृष्टीचे, संयमी व नेहमी सकारात्मक असतात. विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ ओळखून, त्यांना योग्य दिशा दाखवणे हा त्यांचा मोठा गुणधर्म आहे.

मकर

शनीच्या स्वामित्वामुळे मकर राशीचे लोक मेहनती, जबाबदार व निष्ठावान असतात. ते प्रत्येक विद्यार्थ्याला समानतेने पाहतात. अडचणीच्या वेळी हे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी खंबीर आधार ठरतात. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतात.

मग बघा, या पाच राशींचे लोक नकळतच ज्ञानाचे दीपस्तंभ होतात. आता तुम्ही विचार करा तुमची रास यामध्ये आहे का? कारण कदाचित पुढचा महान शिक्षक तुम्हीच असाल!

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)