Premium

१११३ वर्षांनी गुरुदेव ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत भाग्यस्थानी; श्रीमंतीसह दिवाळी आधी मिळेल लाडू- करंजीचा गोडवा

Rare Rajyog: शनी वक्रीच्या पूर्वी हा महत्त्वाचा काळ असेल अशातच गुरु चांडाळ योग संपल्याने काही राशींसाठी अगदी सोन्याहून पिवळा सुखाचा कालावधी सुरु होणार आहे.

Thousand Year Later Guru Rahu Yuti Ends And Shani Gets Active These Rashi to Get Extreme Rich Before Diwali Dates 2023
दिवाळीच्या आधीच 'या' राशींना मिळणार सुखाचा फराळ (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Guru Rahu Yuti End In Ashwin: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीने गोचर, मार्गी किंवा जागृत/अस्त होत असतो. ज्याच्या प्रभावाने वेळोवेळी शुभ अशुभ योग तयार होत असतात. काही योग हे अत्यंत दुर्मिळ असतात, त्यांची निर्मिती विशिष्ट कालावधीमध्ये होण्यासाठी हजारो वर्षांचा अवधी सुद्धा लागू शकतो. असाच एक अत्यंत दुर्मिळ योग शंभर-दोनशे नव्हे तर चक्क १११३ वर्षांनी तयार होत आहे. ३० ऑक्टोबरला नवरात्रीनंतर राहू व गुरुची युती संपुष्टात येणार आहे आणि याच वेळी शनीची तिसरी दृष्टी सक्रिय होणार आहे. शनी वक्रीच्या पूर्वी हा महत्त्वाचा काळ असेल अशातच गुरु चांडाळ योग संपल्याने काही राशींसाठी अगदी सोन्याहून पिवळा सुखाचा कालावधी सुरु होणार आहे. दत्तगुरु व लक्ष्मीच्या कृपने या कालावधीत काही राशींना श्रीमंतीसह आयुष्य बदलून टाकणारी बातमी मिळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीच्या आधीच ‘या’ राशींना मिळणार सुखाचा फराळ

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष ही गुरूच्या स्वामित्वाची रास म्हणून ओळखली जाते. मेष राशीतच राहू व गुरुची युती सर्वाधिक प्रभावी आहे, यामुळे मागील काही काल मेष राशीला काही प्रमाणात कष्ट सुद्धा सहन करावे लागले आहेत. मात्र ३० ऑक्टोबर नंतर मेष राशीसाठी सुखाची पहाट होणार आहे. यावेळी तुम्हाला बँकेच्या व्यवहार व गुंतवणुकीतून प्रचंड मोठा अनपेक्षित लाभ होऊ शकतो. तुमच्या जीवनशैलीत बदल घडण्याची चिन्हे आहेत. परदेश प्रवासाचे योग आहेत. तुम्हाला या कवलधीत तुमच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

गुरु ग्रह आपल्या राशीच्या कुंडलीत नवव्या स्थानी सक्रिय भ्रमण करत आहे. हे धन्वंतरीचे स्थान आहे. यामुळे तुमच्या व कुटुंबियांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासह आर्थिक फायद्याचे दरवाजे सुद्धा उघडणार आहेत. तुम्हाला आयुष्य बदलणारी बातमी ही संतती सुखाच्या स्वरूपात मिळू शकते. आर्थिक फायदे होत असताना खर्चाचे आकडे सुद्धा वाढताना दिसतील त्यामुळे संयम राखावा. तुम्हाला शिक्षणासाठी एखादी प्रवासाची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वाणीवर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.

हे ही वाचा<< आज ऋषिपंचमीला सूर्य-मंगळ युती झाली शक्तिशाली! ‘या’ राशींच्या लोकांना बाप्पा व लक्ष्मी देणार धनरूपी प्रसाद

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीसाठी गुरु हा ग्रह शिक्षणाच्या स्थानाचा स्वामी आहे पण त्याचा प्रभाव भाग्य स्थानावर सुद्धा होत आहे. परिणामी या कालावधीत तुम्हाला ज्ञानातूनच मोठमोठ्या संधी गवसणार आहेत. आरोग्याचे वरदान लाभू शकते. काही वेळा ज्ञान कशाप्रकारे इतरांपर्यंत पोहोचवायचे याचा संभ्रम होऊ शकतो पण बुद्धीची साथ लाभू शकते. तुम्हाला घराच्या खरेदीची संधी मिळू शकतेज्यामुळे तुमच्या राहणीमानात बदल होण्याची चिन्हे आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thousand year later guru rahu yuti ends and shani gets active these rashi to get extreme rich before diwali dates 2023 svs

First published on: 20-09-2023 at 18:03 IST
Next Story
रुचक राजयोग बनताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? मंगळाच्या कृपेने अचानक धनलाभ होण्याची शक्यता