Ganesh Chaturthi Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आज गणेश चतुर्थी आहे. तर गणपती बाप्पाच्या कृपेने मेष ते मीनपैकी कोणत्या राशींचा दिवस कसा जाणार आहे त्याबद्दल या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊया…

Live Updates

Today’s Horoscope Live in Marathi 27 August 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह २७ ऑगस्ट २०२५

17:48 (IST) 27 Aug 2025

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार

Lucky Zodiac Signs Ganesh Chaturthi: भाग्याचे दरवाजे उघडणार! या राशींना गणपती बाप्पाचा थेट आशीर्वाद, आयुष्य उजळणार सोन्यासारखं? …अधिक वाचा
16:09 (IST) 27 Aug 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

नवीन प्रयोगाला यश मिळेल. मित्रांचा सल्ला ग्राह्य मानाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. गोड बोलून कामे साध्य कराल.

15:54 (IST) 27 Aug 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

नोकरी व व्यवसायात मोठी संधी चालून येईल. तुमच्या बाबतीत संशय निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. दिनक्रम व्यस्त राहील. मन विचलीत होऊ शकते. भौतिक सुखाची अनुभूति घ्याल.

13:21 (IST) 27 Aug 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

व्यक्तिमत्वाची छाप पडण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. संयमाने व धीराने निर्णय घ्यावा लागेल. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. वाहनाचे काम निघेल.

12:09 (IST) 27 Aug 2025

गणेश चतुर्थीला अद्भुत महासंयोग! बाप्पाच्या कृपेने ‘या’ ३ राशीचे लोक होतील कोट्यधीश? गणेशोत्सव ठरणार तुमच्यासाठी शुभ…

Ganesh Chaturthi Mahasanyog: गणेश चतुर्थीच्या दिवशी नवपंचम राजयोग, रवियोग, लक्ष्मी नारायण योग, धनयोग, आदित्य योग, राशी परिवर्तन योग, महालक्ष्मी योग आणि गजकेसरी राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर गणपती बाप्पाची खास कृपा होईल. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यवान राशी कोणत्या आहेत… …सविस्तर बातमी
11:17 (IST) 27 Aug 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

मानसिक संतुलन हरवू देऊ नका. पायाच्या दुखण्याकडे लक्ष द्या. काही किरकोळ समस्यांतून मार्ग निघेल. कार्यालयीन सदस्यांशी वादाची शक्यता. मित्रांशी चर्चेतून मार्ग निघेल.

10:33 (IST) 27 Aug 2025

गणेश चतुर्थीला ‘या’ तारखेल्या जन्मलेल्या लोकांवर गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद! गणरायाच्या कृपेने मिळणार अफाट पैसा तर अडथळे आपोआप होतील दूर…

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला काही खास मूलांक असलेल्या लोकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मूलांक असलेल्या लोकांना बाप्पाचा आशीर्वाद मिळणार आहे. …अधिक वाचा
09:28 (IST) 27 Aug 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

आज आपल्या सौंदर्याचे कौतुक होईल. जुनी भांडणे मिटतील. धडाडीवर संयम ठेवा. भौतिक सुखाचा आनंद घेता येईल. व्यापारात काही सुधारणा कराव्या लागतील.

09:03 (IST) 27 Aug 2025

आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर आयुष्यातील अडचणी अखेर होतील दूर

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला प्रीति, अंशुमान योग, सौभाग्य आणि रवि असे ८ योग होत आहेत. त्यामुळे ३ राशीच्या लोकांना खास धनलाभ होऊ शकतो. चला पाहूया या ३ राशी कोणत्या आहेत. …सविस्तर वाचा
07:55 (IST) 27 Aug 2025

गणेश चतुर्थीला बाप्पा देणार ‘या’ राशींच्या प्रयत्नांना यश! कोणाची भांडणे मिटतील तर कोणाला नोकरी-व्यवसायात मिळेल मोठी संधी

Ganesh Chaturthi Vishesh Daily Horoscope In Marathi 27 August 2025 : आज तुमच्या राशीला बाप्पा कोणत्या रूपात आशीर्वाद देणार चला जाणून घेऊयात… …सविस्तर वाचा
07:46 (IST) 27 Aug 2025

Ganesh Chaturthi Shubh Muhurat: गणेश चतुर्थी दिवशी मूर्ती प्रतिष्ठापनेचा आणि पूजेचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या…

Ganesh Chaturthi 2025 Shubh Muhurat: यावर्षी गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवारपासून होत आहे, जो गणपती बाप्पाचा दिवस मानला जातो. याशिवाय या दिवशी शुक्ल योग, सर्वार्थसिद्धी योग आणि रवि योग असे शुभ योग निर्माण होत आहेत. …अधिक वाचा

गणेश चतुर्थी राशिभविष्य (Photo Courtesy- L & T Team)