Today Horoscope Rajyog on 9 October: ९ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाचं गोचर बुधाच्या राशीत म्हणजेच कन्या राशीत होईल. कन्या राशीत शुक्र नीच मानला जातो. त्याच वेळी सूर्यही कन्या राशीत भ्रमण करत आहे. या दोन्ही स्थितींमुळे एक विशेष योग तयार होत आहे, ज्याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे.

९ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह बुधाच्या स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीत शुक्र नीच मानला जातो. त्याच वेळी सूर्यही सध्या कन्या राशीत आहे. ग्रह आणि राशींच्या या स्थितीमुळे नीचभंग राजयोग तयार होत आहे.

नीचभंग राजयोग सामान्यतः अशुभ मानला जातो, पण यावेळी तीन राशींना या योगामुळे चांगले आणि सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया, त्या ३ राशी कोणत्या आहेत ज्यांना या काळात खास फायदा होऊ शकतो.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नीचभंग योग खूप फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याचे मार्ग उघडतील. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. पैशाचा लाभ होण्याची आणि प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता राहील. बेरोजगारांना नोकरी मिळण्यात यश येईल. पगार वाढण्याची आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना नीचभंग राजयोगाचा खास फायदा होऊ शकतो. व्यापारात घेतलेल्या जुन्या निर्णयामुळे मोठा लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील तणाव आणि गैरसमज दूर होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे मार्ग खुले होतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची किंवा नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात मान-सन्मान वाढेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळाल्याने आर्थिक अडचणी कमी होतील.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नीचभंग योग फायद्याचा ठरेल. समाजात त्यांचा मान-सन्मान वाढेल. अडकलेले काम पुर्ण होतील. भौतिक सुख वाढेल आणि ते आपले उद्दीष्ट साध्य करू शकतील. करिअर आणि व्यवसायात नव्या संधी मिळून प्रगतीचे मार्ग उघडतील. पैसा आणि ऐश्वर्य वाढेल तसेच प्रेमसंबंध स्थिर राहतील. मित्र आणि नातेवाईक यांचा सहकार्य मिळेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)