Trigrahi Yoga 2025 Lucky Zodiac Signs Diwali: २०२५ ची दिवाळी काहीशी खास ठरणार आहे, कारण या दिवशी त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, त्रिग्रही योग तेव्हा तयार होतो, जेव्हा तीन ग्रह एका राशीत एकत्र येतात. या दिवशी सूर्य (ग्रहांचा राजा), बुध (बुद्धीचा कारक) आणि मंगळ (यश व संघर्षाचा ग्रह) एकत्र येऊन या योगाचे निर्माण करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या योगाचा प्रभाव काही राशींवर विशेष दिसून येण्याची शक्यता आहे. काही राशींचं नशिब एकदम उजळणार, तर काहींना आयुष्यात मोठी झेप घेण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

त्रिग्रही योग बनल्याने दिवाळीपासून सुरू होणार ‘या’ राशींचा सुवर्णकाळ?

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग सकारात्मक शक्यता देणारा ठरू शकतो. या योगामुळे आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे, तसेच काही दिवसांपासून थांबलेली कामं पूर्ण होऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी लग्न किंवा जोडीदाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता दिसते. या राशीच्या लोकांच्या व्यवसायात प्रगती होऊन त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारणे आणि नवीन नोकरी मिळण्याची शक्यतादेखील ज्योतिषशास्त्रानुसार दिसून येते.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी या योगाचा प्रभाव कारकिर्दीत प्रगती दर्शवतो. घरातील मोठ्यांकडून सल्ला व मदत मिळण्याची शक्यता आहे, तसेच अडचणीत असलेले प्रोजेक्ट किंवा काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नवं घर, वाहन, संपत्ती किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येऊ शकतो. नवीन संधींमध्ये यश मिळण्याची आणि व्यवसायात किंवा नोकरीत उन्नती होण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार दिसून येते.

धनू

धनू राशीच्या लोकांसाठी हा योग व्यवसाय व आर्थिक यश देण्याची शक्यता दर्शवतो. दीर्घकाळ थांबलेले प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतात. पैशांची आवक वाढू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणार्‍यांसाठी योग सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता, प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू शकतं. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच लव्ह लाईफ सुधारण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात दिसते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)