2nd July Panchang & Rashi Bhavishya: आज २ जुलै २०२४ (मंगळवार) रोजी ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी आहे. आजच्या दिवशी कृत्तिका नक्षत्र जागृत असणार असून आजचा राहुकाळ दुपारी ३ पासून सुरु होईल ते संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहील. पंचांगानुसार आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, धृति योग, त्रिपुष्कर योग असणार आहे. दिनविशेष सांगायचे झाल्यास आज योगिनी एकादशी आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. तर आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या व्यक्तींना कसा जाईल हे जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ जुलै पंचांग व राशिभविष्य :

मेष:- खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळा. दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मानसिक क्षमता वाढीस लागेल.

वृषभ:- मध्यवर्ती भूमिका स्वीकारताना काळजी घ्या. वैचारिक गुंतागुंत टाळावी. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घराची जुनी कामे निघू शकतात. तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा.

मिथुन:- सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे.

कर्क:- विनाकारण तोंडसुख नको. भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह:- आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा. खाजगी समस्या सामंजस्याने सोडवाल. कामे झपाट्याने पार पाडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. हातातील संधी सोडू नका.

कन्या:- आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. भावनाप्रधान होऊ नका. तुमचे मनोबल वाढीस लागेल. हित शत्रूंवर मात करता येईल.

तूळ:- कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. भागीदाराची बाजू समजून घ्या. मित्राकडे मनमोकळे करावे. सकारात्मक परिवर्तन घडेल.

वृश्चिक:- काही निकष ठरवावे लागतील. शेजार्‍यांना मदत कराल. कामात कुचराई करू नका. गुंतवणूक करताना सावध राहावे. मनात उगाचच शंका निर्माण होईल.

धनू:- गरज समजून कामे हाती घ्या. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक शांतता लाभेल. दिवसभर कामाची ऊर्जा टिकून राहील.

मकर:- वादाचे मुद्दे समोर आणू नका. भावंडांना समजून घ्यावे लागेल. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. अकल्पित लाभाची शक्यता. वरिष्ठ अधिकार्‍यांची मदत मिळेल.

कुंभ:- अवाजवी खर्च वाढतील. उगाचच सढळ हाताचा वापर करू नका. जुन्या आठवणी दाटून येतील. संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे.

मीन:- मुलांना अभ्यासात मदत कराल. काटकसर करावी लागू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वरिष्ठांशी ताळमेळ साधावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tripushkar yoga with yogini ekadashi 2nd july tuesday panchang and rashi bhavishya mesh to meen which zodiac signs will benefit daily marathi horoscope asp