Vat Purnima Vishesh Rashi Bhavishya In Marathi, 10 June 2025 : १० जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी दुपारी ११ वाजून ३६ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर पौर्णिमा सुरू होईल. दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत सिद्ध योग जुळून येईल. संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज वटपौर्णिमा असणार आहे. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. वटपौर्णिमेचे व्रत केल्याने विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचे वरदान लाभू शकते अशीही मान्यता आहे. तर आज वटपौर्णिमेच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या भाग्यात काय घडणार जाणून घेऊया…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

१० जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Daily Horoscope In Marathi, 10 June 2025)

मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. रेस, जुगार यांतून नुकसान संभवते. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अती विचार करण्यात वेळ वाया जाईल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. वाट विकार बळावू शकतात. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

इतरांचा विश्वास संपादन करावा. अती व्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

स्थावरची कामे मार्गी लागतील. बर्‍याच दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होतील. व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन योजना अंमलात आणाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. काही गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

इतरांच्या मदतीशिवाय कामे पूर्ण करावीत. वडिलोपार्जित कामांतून लाभ संभवतो. मोजकेच बोलण्यावर भर द्याल. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा. अती काटकसर करून चालणार नाही.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

चटकन निराश होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. अडथळ्यातून मार्ग निघेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. घराबाहेर वावरतांना सावध राहा. हित शत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. चार-चौघांत तुमचा दर्जा वाढेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vat purnima 2025 rashi bhavishya 10 june panchang mesh to meen horoscope in marathi vnk 50 asp