Vinayak chaturthi Special Horoscope Today In Marathi, 30 May 2025 : ३० मे २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी आहे. चतुर्थी तिथी रात्री ९ वाजून २१ मिनिटांपर्यंत राहील. रात्री ९ वाजून २९ मिनिटांपर्यंत पुनर्वसु नक्षत्र जागृत असणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग जुळून येणार आहे. राहू काळ १०:३० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज विनायक चतुर्थी असणार आहे. तर आज बाप्पाच्या तुमच्या पदरात कसे सुख टाकणार जाणून घेऊयात…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

३० मे २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 30 May 2025)

दैनिक मेष राशिभविष्य (Today’s Aries Horoscope )

तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope )

आध्यात्मिक प्रगती साधता येईल. तुमच्याकडील ज्ञानाचे कौतुक केले जाईल. उपासनेत प्रगती कराल. उत्तम मानसिक शांतता लाभेल. हातातील संधी सोडू नका.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope)

फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करून चालणार नाही. काटकसरीने वागावे लागेल. वैचारिक गोंधळ टाळावा. मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.

दैनिक कर्क राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope )

भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. फसवणुकीपासून सावध रहा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

दैनिक सिंह राशिभविष्य (Today’s Leo Horoscope)

प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराचे योग्य पथ्य पाळावे. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope )

कामात दिरंगाई जाणवू शकते. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. सहकार्‍यांवर फार विसंबून राहू नका. काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी.

दैनिक तूळ राशिभविष्य (Today’s Libra Horoscope )

घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाला आवर घालावी लागेल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Today’s Scorpio Horoscope )

तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दुचाकी वाहन जपून चालवावे.

दैनिक धनू राशिभविष्य (Today’s Sagittarius Horoscope )

आवक जावक यांचा योग्य मेळ घालावा. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.

दैनिक मकर राशिभविष्य (Today’s Capricorn Horoscope )

सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Today’s Aquarius Horoscope )

मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.

दैनिक मीन राशिभविष्य (Today’s Pisces Horoscope )

पैशाची नड भागली जाईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak chaturthi special horoscope today 30 may 2025 rashi bhavishya in marathi vnk 50 asp