Weekly Numerology Prediction 6 To 12 October 2025 : अंकज्योतिषानुसार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रह-नक्षत्रांच्या विशेष हालचाली होत आहेत. शुक्र ग्रह नीचभंग योग करत सूर्याशी युती करीत आहेत. या योगामुळे शुक्रादित्य राजयोग तर यमाशी नवपंचम योग घडणार आहे. त्याचबरोबर मंगळ तूळ राशीत दिगबली ( ग्रहाची दिशात्मक शक्ती) अवस्थेत आहे, ज्यामुळे कुलदीपक योगाचेही निर्माण होत आहे. शनि मीन राशीत वक्री तर राहू-मिथुन आणि केतू-सिंह राशीत असल्यामुळे नवपंचम राजयोगाची साथ काही मूलांकांना मिळणार आहे.

ज्योतिषींच्या मते या आठवड्यात मूलांक १ ते ९ या सर्वच अंकांवर ग्रहयोगांचा प्रभाव दिसून येईल. पाहू या तुमच्या अंकाचे या आठवड्यात काय म्हणणे आहे :

मूलांक १ (१, १०, १९, २८ तारखेला जन्मलेले )

या आठवड्यात दान-पुण्याचे अनेक प्रसंग येतील. व्यावसायिक जीवनातील अडथळे दूर होतील. नवे मित्र मिळतील, मात्र त्यांच्यासोबत वाद टाळा.

मूलांक २ (२, ११, २०, २९ जन्मलेले लोक)

कायदेशीर प्रकरणांमध्ये अद्याप थोडा विलंब राहील, पण योग्य वेळी निकाल तुमच्या बाजूने लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक ३ (३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेले)

या आठवड्यात रागावर नियंत्रण ठेवा. शब्दांमुळे आप्तेष्ट दुखावू शकतात. वैयक्तिक तणाव ऊर्जा कमी करेल. नव्या व्यवसायासाठी अजून योग्य वेळ नाही.

मूलांक ४(४, १३, २२, ३१ तारखेला जन्मलेले)

आतापर्यंत अडथळा ठरलेल्या गोष्टी दूर होतील. जबाबदाऱ्या नीट सांभाळा, अन्यथा घरगुती मतभेद संभवतात. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मूलांक ५ (५, १४, २३ तारखेला जन्मलेले)

भावना व्यक्त करण्याची वेळ आहे. वरिष्ठांशी जुने प्रश्न सुटतील. लवचिकता ठेवून योजनांमध्ये बदल करा.

मूलांक ६ (६, १५, २४ तारखेला जन्मलेले)

सहकारी, शेजारी किंवा घरगुती नात्यांमध्ये सुधारणा होईल. संवादातून वाद मिटवता येतील. नातेसंबंध नव्याने उभे करण्याची संधी आहे.

मूलांक ७ (७, १६, २५ तारखेला जन्मलेले)

चॅलेंजिंग परिस्थिती शांततेत हाताळाल. रोमँटिक जीवनात प्रामाणिकपणा आणि स्पष्टता ठेवणे आवश्यक. या आठवड्यात तुम्ही इतरांसाठी प्रेरणा ठराल.

मूलांक ८ (८, १७, २६ तारखेला जन्मलेले)

या आठवड्यात ताण-तणाव जाणवू शकतो. प्रियजन मदतीला धावून येतील. जीवनाकडे गंभीरपणे पाहिल्यास कामात प्रगती मिळेल.

मूलांक ९ (९, १८, २७ तारखेला जन्मलेले)

जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. प्राधान्यक्रम बदलतील. प्रलंबित काम पूर्ण करा आणि नव्या प्रोजेक्टसाठी पुढे सरसा.

एकूणच या आठवड्यातील नीचभंग, नवपंचम आणि शुक्रादित्य राजयोगामुळे काही मूलांकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील. योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.