Lucky Number: ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांवरून १२ राशी ठरवल्या जातात. यात प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुण अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याचप्रकारे अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्माच्या तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक पाहून व्यक्तीचे भविष्य, छंद, स्वभाव यांसारख्या विविध गोष्टींचे वर्णन केले जाते. अंकशास्त्रानुसार २०२४ या वर्षावर शनि ग्रहाचा अधिक प्रभाव आहे, कारण – २०२४ (२ + ०+ २+ ४= ८) या संख्येचा मूलांक ८ येतो, अंकशास्त्रात ८ हा अंक शनिचा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या संपूर्ण वर्षावर शनिचा अधिक प्रभाव असणार असल्याचे म्हटले जाते. शिवाय यामुळे ज्या व्यक्तींचा मूलांक ८,१७,२६ आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष अधिक खास परिणाम घेऊन येणारे ठरेल. २०२४ मधील काही महिने संपले असून येणाऱ्या महिन्यात हा मूलांक असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम घडतील.

मूलांक ८ असणाऱ्या लोकांचे चमकणार भाग्य

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८,१७,२६ या तारखेला होतो, त्या व्यक्तींचा मूलांक ८ असतो. २०२४ या वर्षाचा मूलांकदेखील ८ आहे, त्यामुळे या वर्षावर शनिचा अधिक प्रभाव असेल. शिवाय याच्या प्रभावाने ८ मूलांक असणाऱ्या व्यक्तींनादेखील त्याचा फायदा होईल. या व्यक्तींना या वर्षात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील, तसेच आर्थिक समस्यादेखील दूर होण्यास मदत होईल. नोकरी, व्यापार करणाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. मानातील इच्छा पूर्ण होतील. या काळात नवीन गाडी, नवे घर, प्रॉपर्टी खरेदी करू शकता. समाजात मानसन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची मते सर्वांसमोर प्रखरपणे मांडाल.

मूलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी हे संपूर्ण वर्ष सुखमय असेल. या काळात वैवाहिक जीवनही खूप उत्तम असेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडतील. परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळेल. या काळात भौतिक सुख प्राप्त होऊ शकतात.

हेही वाचा: आकस्मित धनलाभ होणार? ३० वर्षांनंतर निर्माण झालेल्या राजयोगाने ‘या’ चार राशींच्या व्यक्ती मिळवणार संपत्तीचे सुख

असे असतात मूलांक ८ असणारे लोक

अंकशास्त्रानुसार मूलांक ८ असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह शनि असल्यामुळे यांच्यावर शनिचा अधिक प्रभाव असतो. हे स्वभावाने खूप शांत, गंभीर आणि मनाने निर्मळ असतात. यांना नेहमी एकांतात राहायला अधिक आवडते. या व्यक्तींना शिक्षण आणि करिअरच्या सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागतो. मात्र, त्यानंतर ते हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यात यशस्वी होतात. हे प्रचंड मेहनती असतात. यांची आर्थिक परिस्थितीदेखील उत्तम असते.