Raja yoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह, तसेच नक्षत्राचे काही ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचे कधी सकारात्मक; तर कधी नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. या ग्रहांच्या राशी परिवर्तनाने काही शुभ योग आणि राजयोगदेखील निर्माण होतात. या राजयोगाचा प्रभाव प्रत्येक राशीवर होतो. रविवारी (१९ मे) शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करील, तसेच शनीदेखील कुंभ राशीत आहे. त्यामुळे जवळपास ३० वर्षांनंतर शश आणि मालव्य राजयोग निर्माण होत आहे; ज्याचा प्रभाव काही राशींच्या लोकांवर पाहायला मिळू शकतो.
शश आणि मालव्य राजयोग ‘या’ राशींसाठी लाभदायी
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार शश आणि मालव्य राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक परिणाम घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात व्यापाऱ्यांना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरसंबंधित समस्या दूर होऊ शकतात. उत्पनाचे नवीन स्रोत मिळू शकतील. मेहनतीवर लक्ष केंद्रित करा, आनंदी वार्ता कानी पडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींनादेखील शश आणि मालव्य राजयोगाचा खूप फायदा होईल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. उद्योगधंद्यात वाढ होईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळू शकेल.
मकर
मकर राशी व्यक्तींनादेखील शश आणि मालव्य राजयोग अनेक भौतिक सुखांची प्राप्ती करून देणारा ठरेल. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. चांगल्या कर्माचे फळ मिळेल. ज्ञान प्राप्त करण्याची तळमळ पूर्ण होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: १४ जूनपर्यंत होणार भरभराट! सूर्य चमकवणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; कमवणार बक्कळ पैसा
कुंभ
कुंभ राशीसाठी शश आणि मालव्य राजयोग खूप भाग्यकारक सिद्ध होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)