छत्रपती संभाजीनगर : प्रमुख महानगरे प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. कलावंतही प्रदूषणाने अस्वस्थ आहेत, मात्र वाढते प्रदूषण हा प्रत्येकाच्याच चिंतेचा विषय व्हायला हवा, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक, दिवंगत कुमार गंधर्व यांचे नातू पंडित भुवनेश कोमकली यांनी व्यक्त केले. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आले असता त्यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता बोलून दाखविली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्यक्रमाची सुरूवात करण्यापूर्वीच पं. कोमकली यांनी अलिकडेच दिल्लीतून आल्याने घशाचा त्रास जाणवत असल्याचे सांगत महानगरांमधील प्रदूषित वातावरणावर भाष्य केले. प्रदूषणासाठी व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवरील जबाबदारीचा विचार करूनच योगदान द्यावे लागणार आहे. प्रदूषण होणार नाही, अशा सूत्राचे आचरण अंगीकारावे लागेल, असेही पंडित कोमकली म्हणाले. कार्यक्रमानंतर ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीशी प्रदूषणाच्या मुद्दय़ावर त्यांनी अधिक मोकळेपणाने आपले विचार बोलून दाखविले. पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमांच्या नियोजनासाठी दिल्लीत वास्तव्यास होतो. प्रदूषणामुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद ठेवण्याची वेळ येते हे चित्र अस्वस्थ करणारे असल्याचे ते म्हणाले.तासाभरात ४०-५० सिगारेटी ओढून होणार नाही, एवढे प्रदूषण धूम्रपान न करणाऱ्यांच्याही वाटेला येते. पण त्यासाठी केवळ व्यवस्थेला जबाबदार धरून चालणार नाही. आपणही प्रदूषण होणार नाही, याची जबाबदारी उचलायला हवी.- पं. भुवनेश कोमकली, प्रख्यात शास्त्रीय गायक

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhuvnesh komkali expressed concern over the increasing pollution during the diwali pahat programme at chhatrapati sambhajinagar amy