औरंगाबादमध्ये टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात करोनाबाधितांची संख्या ९४ ने वाढली. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या दोन हजार ५२४ एवढी झाली आहे. आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद शहरातील मदनी चौकातील ६५ वर्षांचा पुरुष, फाजलपुरा भागातील ५२ वर्षांचा व्यक्ती तर मिलकॉनर्र भागातील तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे. त्यातील एका रुग्णास पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता. दरम्यान घाटी रुग्णालयातील मृत रुग्णसंख्या आता १०१ वर गेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2020 रोजी प्रकाशित
करोनामुळे औरंगाबादमध्ये १३१ जणांचा मृत्यू
करोनाबाधितांची संख्या दोन हजार ५२४ एवढी झाली आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-06-2020 at 01:55 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona death 131 in aurangabad abn