१ जूनपासून उपोषण
सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगरकडील शेतकऱ्यांची थकीत रक्कम मिळावी, यासाठी किसान सभेतर्फे १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शेतकरी शुगर लि. या कारखान्यास परभणी, जालना, लातूर, बिदर आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी २०१५-२०१६मध्ये हजारो मेट्रिक टन ऊस दिला. परंतु कारखान्याने अजून या शेतकऱ्यांना पहिला हप्ताही दिला नाही. एफआरपी दूरच, कारखान्याकडे ४ कोटी २२ लाख ४७ हजार एफआरपी देयकाची थकीत बाकी आहे. अनेक शेतकऱ्यांना पहिला हप्ताही मिळाला नाही. ५ व १३ मे रोजी परतूर व औराद (जिल्हा बीदर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावर जिल्हाधिकारी महिवाल यांनी बठक घेतली. बठकीत शेतकऱ्यांनी २० मेपर्यंत बिल देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची भेट घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2016 रोजी प्रकाशित
महाराष्ट्र शुगरकडील शेतकऱ्यांच्या थकीत रकमेसाठी
सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगरकडील शेतकऱ्यांची थकीत रक्कम मिळावी
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 22-05-2016 at 00:02 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hunger strike in parbhani for drought farmer