छत्रपती संभाजीनगर: दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, दोघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवीण अशोक दिलवाले (वय ४७) व बद्रीनाथ लक्ष्मण चव्हाण (वय ३८), अशी लाच स्वीकारणाऱ्या अनुक्रमे तलाठी व खासगी व्यक्तीची नावे आहेत. प्रवीण दिलवाले हा काटे पिंपळगाव सज्जाचा तलाठी आहे. तर बद्रीनाथ हा शेतकरी आहे.

हेही वाचा : ओडिसामध्ये नवीन मत्स्य प्रजातीचा शोध

तक्रारदार यांचे वडील व चुलत भाऊ यांची वारसा हक्काने नोंद घेऊन सात बारा देण्यासाठी आरोपींनी पंचासमक्ष दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तलाठ्याने बद्रीनाथकडे दहा हजार देण्याचे तक्रारदारास सांगितले होते. सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chhatrapati sambhajinagar talathi and a person detained for accepting bribe of rupees 10 thousand css