छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा टाकून साडे पाच किलो सोने, ३२ किलो चांदी चोरून नेल्याप्रकरणात मंगळवारी गुन्हे शाखेने चकमकीत ठार झालेल्या अमोल खोतकर याची बहीण रोहिणीकडून २२ तोळे सोने व गावठी कट्ट्याचे सात काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
या गुन्ह्यात रोहिणीला अटक करण्यात आली असून, पंचासमक्ष तिच्या राहत्या घराची झडती घेतली असता २२ तोळे सोने पुरून ठेवल्याचे आढळून आले. एकूण १९ लाख ७२ हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या १८ पेक्षा वर गेली आहे. रविवारीही अंबाजोगाईतील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.