देशातील दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि परवडेल अशा किमतीत अनेक नवनवीन कार बाजारात लाँच करत असते. तसेच, काही मॉडेल्स अपडेट करत असते. महिंद्रा कंपनीच्या कार जबदस्त फीचर्स, लूक, डिझाईनमुळे खूप पसंत केल्या जातात. आता देशांतर्गत ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्राने आपली नवीन कॉम्पॅक्ट भारतात लाँच केली आहे आहे. या कारची बुकींग सुरु होताच या कारला भारतीय बाजारात तुफान मागणी मिळत आहे. या कारची बुकींग सुरु होताच १० मिनिटांत २७,००० बुकिंग आणि १ तासाच्या आत तब्बल ५० हजार गाड्या बुक झाल्या आहेत. आनंद महिंद्रा यांनी याबाबतचे सोशल मिडियावर माहिती देत ग्राहकांचे आभार मानले आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने नुकतीच आपली बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट ‘SUV Mahindra XUV 3XO’ भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या SUV ची किंमत फक्त ७.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. तुम्ही ही कार ऑनलाइन बुक करू शकता किंवा तुमच्या जवळच्या महिंद्रा डीलरशीपला २१,००० रुपये देऊन बुक करू शकता.

२६ मे पासून कारची डिलिव्हरी सुरू

कंपनी कारची डिलिव्हरी २६ मे पासून सुरू करणार असल्याची माहिती आहे. ही कार ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Mahindra XUV 3XO ही प्रत्यक्षात पूर्वीची XUV 300 ची नवीन आवृत्ती आहे. यात नवीन डिझाइन, चांगली कामगिरी, नवीन वैशिष्ट्यांसह नवीन स्वरूप, पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली इंजिन आणि अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

(हे ही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! Swift नव्या अवतारात ९ रंगात अन् कमी किमतीत देशात दाखल, मायलेज २५.७५ किमी)

या वाहनांशी स्पर्धा होणार

भारतीय बाजारपेठेत ही कार टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट यांसारख्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे. XUV 3XO एकूण नऊ प्रकारांमध्ये येते. यात MX1, MX2, MX2 Pro, MX3, MX3 Pro, AX5, AX5 L, AX7 आणि AX7 L चा समावेश आहे. या कारमध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.

Mahindra XUV 3XO वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्रा लाइटिंग, लेदर सीट्स, नवीन सेंटर कन्सोल आणि मागील एसी व्हेंट्स उपलब्ध आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने, सर्व वाहने सर्व मॉडेल्समध्ये ६ एअरबॅग्ज, मागील डिस्क ब्रेक, ESP आणि ISOFIX सह उपलब्ध आहेत. वरील मॉडेलमध्ये, तुम्हाला ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट असिस्ट, लेव्हल २ ADAS यासारखी अधिक वैशिष्ट्ये मिळतात.