आजकाल प्रत्येकजणांच्या घराबाहेर फोर व्हिलर पहायला मिळते. प्रत्येक मॉडेल मार्केटमध्ये लाँच करताना कंपनी नवनवीन advance features देत असते. तर तुम्ही रोजच्या बातम्यांमध्ये ABS and EBD हे शब्द ऐकले असतील. किंवा तुम्ही वापरत असलेल्या गाड्यांमध्ये ती सिस्टीम सुद्धा असेल . पण हे ABS and EBD नक्की आहे तरी काय ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Anti-lock Braking System (ABS)

Anti-lock Braking System म्हणजे (ABS) ही सिस्टीम सामान्यतः फोर व्हिलर, मोटारसायकल, स्कुटर्स, ट्रक्स, आणि बस यामध्ये आढळून येते. वेगाने चालविणाऱ्या वाहनांना अचानक जोरात ब्रेक लावायची वेळ आली तर या सिस्टीममुळे चाके लॉक होत नाहीत. त्यामुळे वाहन एका ठिकाणी थांबत नाही तर सुरक्षितरित्या एखाद्या वस्तूपासून लांब जाऊ शकते.

Anti-lock Braking System नक्की कसे काम करते ?

ABS सिस्टीममध्ये चाकांच्या स्पीडचे निरीक्षण करण्यासाठी सेन्सर वापरले जातात. आणि हे सेन्सर ती माहिती सतत Electronic Control Unit or ECU कडे पाठवत असतात. जेव्हा सेन्सर्सकडून हार्ड ब्रेकिंगची माहिती ECU कडे पाठवली जाते तेव्हा ABS युनिट जलदपणे ब्रेक लावते आणि सोडून देते . त्यामुळे हे युनिट चाकांना लॉक होण्यापासून रोखते . यामुळे चालकाला सुरक्षितपणे थांबण्यासाठी मदत होते. चालकाला ब्रेक दाबणे आवश्यक असते मात्र जेव्हा जोरात ब्रेक लावला जातो तेव्हा ABS बाकी काळजी घेत असते. ABS चालू असताना, ड्रायव्हरला त्यांच्या पायाखालील ब्रेक पेडल धडधडताना जाणवते, जे पूर्णपणे सामान्य स्थिती आहे.

हेही वाचा : Upcoming Scooter 2023: बाजारात धमाका करणार ‘या’ जबरदस्त मायलेज देणाऱ्या स्कूटर; किंमत फक्त…

ABS चे प्रकार

ABS हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित असते. वाहने चालकांना ही सिस्टीम बंद करण्याची परवानगी देतात. उदाहरणार्थ मोटारसायकलमध्ये स्विच करण्यायोग्य ABS आहे जे ऑफ-रोड वापरासाठी बंद केले जाऊ शकते.

Electronic Brakeforce Distribution (EBD)

Electronic Brakeforce Distribution ही सिस्टीम स्वतंत्र येते किंवा ABS सह एकत्रित असते. Two wheeler व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांमध्ये सामान्य सुरक्षा प्रणाली आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 2 January 2023: आठवड्याची नवी सुरुवात, आज पेट्रोल स्वस्त की महाग? पहा तुमच्या शहरांतील किंमती

Electronic Brakeforce Distribution नक्की कसे काम करते ?

EBD ही सिस्टीम चाकांचा वेग , गाडीचा वेग , इंजिन , आरपीएम , रस्त्यावरील स्थिती व इतर गोष्टींशी गणना करत असते. या सिस्टीममुळे चालकाला कारवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abs and ebd systems in four wheelers not lock wheels the driver can control the vehicle auto news tmb 01