होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने बनावट पार्ट्सविरोधातील मोहिमेचा विस्तार करत पुणे येथील एका घाऊक विक्रेत्याकडून पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे २,४०० बनावट पार्ट जप्त केले आहेत. होंडाच्या समर्पित बौद्धिक संपदा (आयपी) विंगने पोलीस स्टेशन भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे येथील पोलीस पथकाच्या मदतीने २५ नोव्हेंबर २०२२ रोजी शोध आणि जप्तीची कारवाई केली आणि मेसर्स भगवती ऑटोमोबाईल्सकडून मोठ्या प्रमाणात बनावट दुचाकींचे भाग जप्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हा’ बनावट साठा केला जप्त

कॉपीराईट कायद्याच्या तरतुदीनुसार आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, छाप्याच्या कारवाईदरम्यान ५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ‘होंडा अस्सल पार्ट्स’ म्हणून ब्रँड केलेले २, ४०० हून अधिक बनावट भाग सापडले आणि जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या भागांमध्ये एअर फिल्टर, क्लच प्लेट्स, पिस्टन सिलिंडर इत्यादींचा समावेश आहे. पोलिसांनी देवेंद्र शहा, मालक आणि मेसर्स भगवती ऑटोमोबाईलचे व्यवस्थापक चेतन बोरा यांनाही अटक केली आहे.

(हे ही वाचा: होंडा आणतेय नवीन दमदार कार; मारुतीच्या ब्रेझाशी होणार जोरदार टक्कर, पाहा कधी होणार सादर )

‘इतक्या’ ठिकाणी टाकले छापे

Honda बनावट पार्ट्सबाबत सतर्क आहे आणि रायडरच्या सुरक्षेसाठी वचनबद्धतेसह, Honda च्या IP विंगने विविध राज्य पोलिस विभागांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर, पोलिसांनी पुणे (महाराष्ट्र), बंगळुरू (कर्नाटक), नवी दिल्ली, गाझियाबाद (यूपी), मालदा (पश्चिम बंगाल) येथे छापे टाकून २७,००० हून अधिक बनावट भाग जप्त केले आहेत.

बनावट पार्ट्स केवळ वाहनाची कार्यक्षमता कमी करत नाहीत तर वाहनाच्या इष्टतम कामगिरीसाठी आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी होंडा अस्सल भाग देखील कमी करतात. Honda ची समर्पित बौद्धिक संपदा (IP) शाखा भविष्यातही बनावट भागांविरुद्धची कारवाई सुरू ठेवेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on fake parts of honda in pune fake parts worth five lakh rupees seized pdb